आलिया भट्ट – रणबीर कपूर यांच्या नव्या बंगल्याचा Inside Video समोर, क्लासी आहे प्रत्येक कोपरा

Alia Bhatt and Ranbir Kapoor House Video: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं मोठं स्वप्न अखेर पूर्ण, दोघांच्या नव्या बंगल्याची Inside Video अखेर समोर... अत्यंत क्लासी आणि आलिशान आहे घरातील प्रत्येक कोपरा...

आलिया भट्ट - रणबीर कपूर यांच्या नव्या बंगल्याचा Inside Video समोर, क्लासी आहे प्रत्येक कोपरा
| Updated on: Aug 25, 2025 | 5:20 PM

Alia Bhatt and Ranbir Kapoor House Video: अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर कायम चाहत्यांना कपल्स गोल्स देत असतात. दोघं कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता आलिया आणि रणबीर त्यांच्या नव्या बंगल्यामुळे चर्चेत आले आहे. आलिया आणि रणबीर लवकरच त्यांच्या नव्या बंगल्यात शिफ्ट होणार आहेत. सध्या त्यांच्या घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील आलिया आणि रणबीर यांचा नवा बंगला प्रचंड आवडला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून आलिया आणि रणबीर यांच्या नव्या घराचं काम सुरु होतं. सांगायचं झालं तर, दोघांचं या घराशी वैयक्तिक नातं आहे कारण ते घर कपूर कुटुंबाचा वारसा आहे. ते घर आजोबा राज कपूर आणि आजी कृष्णा राज कपूर यांच्या मालकीचं होतं आणि नंतर ते नीतू आणि ऋषी कपूर यांना मिळालं. आता त्या घराला आलिया आणि रणबीर यांनी नवीन रुप दिलं आहे.

 

 

आजी – आजोबांचे आशीर्वाद असल्यामुळे आलिया – रणबीर यांना घराबद्दल विशेष आकर्षण आहे. एवढंच नाही तर, आलिया तिच्या सासू नीतू कपूरसह या घराच्या सजावटीकडे विशेष लक्ष देत होती. ती अनेकदा तिच्या सासू किंवा पती रणबीरसोबत घर पाहण्यासाठी जायची. आता अखेर त्यांचा स्वप्नातील महाल तयार झाला आहे.

सांगायचं झालं तर, आलिया आणि रणबीर यांचं घर 6 मजल्याचं आहे.. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये घरातील एक झलक दिसत आहे. समुद्रकिनारी आलिया आणि रणबीर यांचा आलिशान बंगला आहे. व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र आलिया आणि रणबीर यांच्या नव्या घराची चर्चा सुरु आहे…

आलिया आणि रणबीर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, आलिया आणि रणबीर यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं, त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फार कमी आणि ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत आलिया आणि  रणबीर यांचं लग्न झालं. त्यानंतर आलिया आणि रणबीर यांनी लेक राहा हिचं जगात स्वागत केलं… त्यांच्या मुलीचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.