मुलाच्या कबरीवर ढसाढसा रडली अभिनेत्री, घटस्फोटाने सर्वच उद्ध्वस्त; ना करिअर टिकलं ना कुटुंब..

सर्वकाही सोडून गडगंज श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न बॉलिवूड अभिनेत्रीला पडलं महागात... मुलाच्या कबरीवर ढसाढसा रडली, घटस्फोटानंतर सर्वकाही झालं उद्ध्वस्त; ना करिअर टिकलं ना कुटुंब..

मुलाच्या कबरीवर ढसाढसा रडली अभिनेत्री, घटस्फोटाने सर्वच उद्ध्वस्त; ना करिअर टिकलं ना कुटुंब..
| Updated on: May 07, 2026 | 9:47 AM

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या सिनेमांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. काही अभिनेत्री अशा आहे ज्यांनी करियर सोडून कुटुंबाला अधिक महत्त्व दिलं. पण आज त्यांचं करियरही टिकलं नाही आणि कुटुंब देखील दूर झालं आहे. असं संकट बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर ओढावलं आहे. लग्नानंतर अभिनेत्री नवऱ्याची साथ दिली, पण आज त्यानेच अभिनेत्रीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्रीला मुलांना भेटणं देखील कठीण झालं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सेलिना जेटली आहे… सेलिना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केला. ज्यामध्ये अभिनेत्री मुलाच्या कबरीवर बसून ढसाढसा रडताना दिसत आहे.

व्हिडीओ पोस्ट करत सेलिना हिने पती पीटर हाग यांच्यावर गंभीर केले आहे. ‘गेल्या काही आठवड्यांपासून माझं आयुष्य फार कठीण झालं आहे.’ ऑस्ट्रिया येथील कोर्टात सुरु असलेल्या केसबद्दल देखील अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. नवऱ्यावर आरोप करत अभिनेत्री म्हणाली, कोर्टाने मुलांना भेटण्याची परवानगी दिली असली तरी, मुलांना भेटू देत नाही… असं सेलिना म्हटली आहे.

‘ऑस्ट्रियन न्यायाधीशासमोर तोंडी हमी देऊनही, मला माझ्या मुलांना भेटू दिलं जात नाहीये… मी फक्त माझ्या एकाच मुलाला भेटू शकली आहे आणि त्या मुलाचं नाव आहे शमशेर… ज्याचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं… एका आईसाठी ही हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर तिने सर्वकाही फक्त तिच्या मुलांसाठी केलं… आज त्या आईवर अशी वेळ आली आहे…’

 

 

पुढे सेलिना म्हणाली, ‘हा व्हिडीओ शेअर करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. मला जगाला माझं दुःख सांगायचं आहे… गेल्या काही दिवसांपासून माझ्या अडचणी वाढत आहेत… मी माझ्या घटस्फोटाच्या सुनावणीसाठी ऑस्ट्रिया येथे होती.’ दुःख व्यक्त करत अभिनेत्री म्हणते, ‘नवऱ्याच्या करियरसाठी मी सर्वकाही सोडून दिलं. पण नंतर मला कळलं की, माझ्यासोबत गैरवर्तन होत आहे.’

लग्नानंतर सेलिनाचं झालं शोषण

पोस्टमध्ये सेलिना म्हणते, ‘माझा देश, माझे आई – वडील, माझं सर्व काम सोडून दिलं आणि भारतातून दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रिया, पुन्हा दुबई आणि पुन्हा ऑस्ट्रिया गेली… हे सर्व मी नवऱ्याच्या करियरसाठी केलं. मी एकटीने माझ्या मुलांना वाढवलं, त्यांच्या करिअरच्या महत्त्वाकांक्षांमध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले आणि आम्ही मिळून उभारलेल्या आयुष्याचं संगोपन केलं. माझ्या लग्नाप्रती आणि मुलांप्रती असलेल्या माझ्या समर्पणाच्या बदल्यात, माझी संपत्ती हळूहळू माझ्यापासून हिरावली गेली आणि मला सर्व प्रकारचा मानसिक व भावनिक छळ सहन करावा लागला… असं देखील अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणाली आहे.

सेलिना जेटली हिचं खासगी आयुष्य

सेलिना आणि पीटर यांनी 2010 मध्ये लग्न केलं आणि मार्च 2012 मझ्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा 2017 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. ज्यामधील एका मुलाची ‘हाइपोप्लास्टिक हार्ट कंडीशन’मुळे निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटाबद्दल सांगत आहे.

Follow Us