AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो कोणाचा खून… चेतनच्या काकांनी दिली महत्त्वाची माहिती; सियाबद्दलही मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता सियाचा प्रियकर चेतन चौधकीच्या कुटुंबीयांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

तो कोणाचा खून... चेतनच्या काकांनी दिली महत्त्वाची माहिती; सियाबद्दलही मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Ketan Sia and ChetanImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 24, 2026 | 7:43 PM
Share

पुण्यातील केतन अग्रवाल या तरुणाच्या हत्येचे प्रकरण संपूर्ण देशात चर्चेत आहे. त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला लोहगडावरून खाली ढकलून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अशातच आता या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या दोघांनी पूर्व नियोजित कट रचून ही हत्या केल्याचेही आता समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता चेतन चौधरीच्या काकांनी भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

चेतन निर्दोष आहे…

चेतनचे काका उदाराम चौधरी यांनी म्हटले की, चेतनचा या प्रकरणात सहभाग नाही. तो पूर्णपणे निर्दोष आहे आणि त्याला एका खोट्या प्रकरणात गोवण्यात येत आहे. दुकानात वारंवार फोन येत असल्याने त्याने आपला मोबाईल फोन सोबत घेतला होता. नीरजसुद्धा त्याच्यासोबत होता. चैतन्यने काय केले किंवा का केले, याबद्दल सध्या आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.

तो कोणाचा खून करू शकत नाही…

पुढे बोलताना उदाराम चौधरी यांनी सांगितले की, ‘चेतन असे कृत्य कधीही करणार नाही. तो कधीही कोणाचा खून करू शकत नाही. तो खेळामध्ये आवड असलेला एक साधा मुलगा आहे. तो अशा कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात कधीही सामील होणार नाही. आम्ही सियाला ओळखत नाही. आम्हाला सियाची ओळख आणि तिच्या हालचालींबद्दल फक्त मीडिया आणि बातम्यांमधूनच कळले.

वकिलांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करणार…

उदाराम चौधरी यांनी पुढे बोलताना सांगितले की, आम्ही सध्या कायदेशीर सल्ला घेत आहोत आणि आमच्या वकिलांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करू.आमचा कोणाशीही वाद किंवा संघर्ष नाही. संपूर्ण बाजारपेठेत आमचे कोणाशीही वैर नाही. आम्ही गोयल कुटुंबाला ओळखत नाही, किंवा त्यांच्याशी आमचे कोणतेही संबंध नव्हते. गेल्या वर्षभरात चेतनने काय केले आहे किंवा तो कोणाच्या संपर्कात होता, याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलीस सध्या कंपनीचे कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावत असून, तपास सुरू आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा