AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Case: 5 स्टार हॉटेलचे 70 रुम बुक, बर्थडेची जंगी तयारी पण…केतन अग्रवाल प्रकरणातील मोठी अपडेट समोर

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. सियासाठी केतनने 5 स्टार हॉटेलमध्ये वाढदिवसाचे भव्य नियोजन केले होते, 70 रुम्स बुक केले होते. मात्र, सियाच्या मनात वेगळाच कट होता. तिने चेतन चौधरीसोबत मिळून लोहगडावर केतनचा खून केला. लग्नाच्या स्वप्नांना तिने क्रूरपणे मोडून काढले.

Ketan Agarwal Case: 5 स्टार हॉटेलचे 70 रुम बुक, बर्थडेची जंगी तयारी पण...केतन अग्रवाल प्रकरणातील मोठी अपडेट समोर
Ketan Agraval Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 24, 2026 | 6:27 PM
Share

केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. या माहितीतून केतनचं त्याच्या होणाऱ्या बायकोवर म्हणजे सिया गोयलवर तसेच अग्रवाल कुटुंबाचं आपल्या होणाऱ्या सुनेवर किती अतूट प्रेम होतं हे स्पष्ट होत आहे. पण सियाच्या मनात वेगळाच काळा प्लान शिजत होता. त्यामुळेच केतनची हत्या झाली. केतनने सियालचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. 20 जून रोजी सियालचा वाढदिवस होता. लग्नाआधीचा हा वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी त्याने एका फाइव्ह स्टार हॉटेलचे 70 रुम बुक केले होते, अशी माहिती समोर आली आहे. पण 20 जून कधीच उजाडला नाही. नियतीला काही औरच मंजूर होतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन आणि सियाचे कुटुंब 20 जून रोजी महाबळेश्वर येथे सियाचा वाढदिवस साजरा करणार होते. केतनच्या वडिलांनी या हिल स्टेशनवर एका फाइव्हस्टार हॉटेलचे 70 रुम बुक केले होते. पण हा वाढदिवसच करायचा नसल्याचं सियाच्या मनात होतं. त्यामुळे तिने वाढदिवसाच्या आधीच केतनला पुण्यातील लोहगडावर जायचा हट्ट धरला. केतनला लोहगडावर जायचं नव्हतं. पण तिने त्याच्याशी वाद घातला. भांडण केलं आणि जबरदस्तीने त्याला लोहगडावर घेऊन गेली.

चेतनला इव्हेंटमध्ये भेटली

केतन आणि सियाचा फेब्रुवारी साखरपुडा झाला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांचं लग्न होणार होतं. लग्नाची तयारी सुरू होती. लग्नासाठी प्रायव्हेट जेट बुक करण्यात आले होते. जयपूरचा एक महलही बूक करण्यात आला होता. मात्र, तपास करणाऱ्या पोलिसांच्या टीमच्या दाव्यानुसार, जेव्हा लग्नाची तयारी सुरू होती, तेव्हा सिया आधीपासूनच चेतन चौधरीच्या संपर्कात होती. हे दोघेही 2025मध्ये एका बिझनेस इव्हेंटमध्ये भेटले होते. सिया बेकरीचा व्यवसाय करत होती, तर चेतन ड्रायफ्रूट्सशी संबंधित व्यापारात होता.

तो अडथळा वाटायचा…

पोलीस सूत्रांच्या मते, चेतनला केतन त्याच्या आणि सियामधील अडथळा वाटत होता. त्यामुळे त्यांनी केतनला आपल्या मार्गातून हटवण्याचा प्लान रचायला सुरुवात केली. या कटाचा भाग म्हणूनच सियाने दोन वेळा केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने आणले होते. दोन्ही वेळा तिने केतनला मारण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न फसल्यानंतर तिने दुसऱ्या प्रयत्नात केतनला मारल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?