
कधी कधी चित्रपटांच्या शुटींगदरम्यान कलाकारांना अनेक गोष्टींचा अनुभव येत असतो. किंवा काही भुमिकांसाठी कलाकारांना त्या वातावरणात जाऊन स्वत:ला तयार करावं लागतं. पण त्यावेळेस काही अडचणींनाही सामोरं जावं लागतं. असाच काहीसा विचित्र अनुभव आला एका अभिनेत्रीला.
अभिनेत्री काही दिवस झोपडपट्टीत राहिली.
भुमिकेसाठी ही अभिनेत्री काही दिवस झोपडपट्टीत राहिली. पण त्यानंतर तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. जसं की तिची भाषा बदलत असल्याचा तिला अनुभव आला. एवढंच नाही तर तिच्या डोक्यात उवा देखील झाल्याचं तिने सांगितलं. शुटींग दरम्यान आलेला हा अनुभव अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितला आहे.
शूटिंगदरम्यानचे विचित्र अनुभव
ही अभिनेत्री म्हणजे दिव्या खोसला. ‘एक चतुर नार’ या चित्रपटाच्या सेटवर दिव्या खोसलासोबतही असेच काहीसे घडले . एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने शूटिंगदरम्यानचे असे अनुभव सांगितले जे खरोखरच तिच्यासाठी आव्हानात्मक होते. पण तिचे पात्र 100 टक्के खरे दिसावे म्हणून दिव्याने हे आव्हान स्वीकारले होते.
नाल्याला लागून असलेल्या झोपडपट्टी शुटींग
दिव्याने सांगितले की या शूटिंग दरम्यान तिच्यासाठी सर्वात आव्हानात्मक होते ते म्हणजे एका घाणेरड्या नाल्याजवळ शुटींग करणे आणि बरचंसं शुटींग हे तिला नाल्याजवळच उभे राहून करावं लागत होतं. दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी तिला याबद्दल आधीच कोणतीही कल्पना दिला नव्हती. दिव्याने सांगितले की तिच्या मनात पहिली गोष्ट आली की ती चुकून त्या नाल्यात पडू नये. दिव्या म्हणाली, “मी या बाबतीत खूप क्लमसी आहे, म्हणून अचानक एखाद्या गोष्टीशी टक्कर होणे किंवा पडणे माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. म्हणूनच मला नाल्यात पडण्याची खूप भीती वाटत होती पण सर्व काही व्यवस्थित झाले.”
केसात उवा झाल्या
दिव्याने सांगितले की, शूटिंग दरम्यान तिला 6 दिवस झोपडपट्टीत राहावे लागले. या काळात स्वच्छतेची समस्या निर्माण झाली. त्यामुळे तिच्या डोक्यात उवा देखील झाल्या होत्या. शूटिंगनंतर तिला त्या बऱ्या करण्यासाठी उपचार घ्यावे लागले. दिव्याचा हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात इतकी करोडपती असलेली अभिनेत्रीने तिच्या पात्रासाठी खूप मेहनत घेतल्याचं नक्कीच तिच्या अनुभवातून दिसून येत आहे.