25 वर्षांची अभिनेत्री… अमिताभ बच्चन यांच्यासोबत इंटिमेट सीन… फक्त 3 सिनेमात केलं काम… त्यानंतर बंद खोलीत अशा अवस्थेत आढळला मृतदेह

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी झोतात आली आणि अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना, बंद खोलीत अशा अवस्थेत आढळला मृतदेह... अमिताभ बच्चन यांच्यासोबत इंटिमेट सीनमुळे आलेली चर्चेत... आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

25 वर्षांची अभिनेत्री... अमिताभ बच्चन यांच्यासोबत इंटिमेट सीन... फक्त 3 सिनेमात केलं काम... त्यानंतर बंद खोलीत अशा अवस्थेत आढळला मृतदेह
अभिनेते अमिताभ बच्चन
| Updated on: Jan 10, 2026 | 2:04 PM

प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री होण्याचं स्वप्नात मनात बाळगत अनेक अभिनेत्री मायानगरीत येतात आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. काही अभिनेत्रींचं स्वप्न पूर्ण होतं, तर काही पून्हा घरी जातात… पण काहींच्या नशिबात तर मृत्यू लिहिलेला असतो. आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. असंच काही एका अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. अभिनेत्रीने तीन सिनेमांमध्ये काम केलं. पण महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनमुळे अभिनेत्री चर्चेत आली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख भक्कम करत असताना अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठं वादळ आणि क्षणात सर्वकाही संपवलं… अभिनेत्री स्वतःला संपवलं. अखेर बंद खोलीत अभिनेत्री मृतदेह आढळल्यानंतर अभिनेत्रीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला… सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून नफीसा रिजवी खान होती, जीने जिया खन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

जिया हिने 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल से’ मध्ये छोटी भूमिका साकारली होती. पण ‘निशब्द’ सिनेमातून अभिनेत्रीने स्वतःची ओळख भक्कम केली. सिनेमात जिया हिने बिग बींसोबत स्क्रिन शेअर केली. ‘निशब्द’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 2007 मध्ये सिनेमा प्रदर्शित झालेला, पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा फेल ठरला… सिनेमात अभिनेता अफताब शिवदसानी आणि श्रद्धा आर्या यांसारख्या कलाकारांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती…

त्यानंतर अभिनेता आमिर खान याच्या ‘गजनी’ सिनेंमात देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली. पण 2010 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हाउसफुल’ सिनेमा हा जिया हिचा शेवटचा सिनेमा ठरला.

जिया खान हिचं निधन

जिया खान हिचं निधन 3 जून 2013 मध्ये झालं. मुंबईतील तिच्या घरात तिचा मृतदेह आढळला. अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य फार कमी वयात संपवलं. तेव्हा जिया फक्त 25 वर्षांची होती. निधनानंतर सुसाइड नोटमधून धक्कादायक कारण समोर आलं, त्यामध्ये तिने सूरज पंचोलीसोबतचे तिचं नातं, तिचा गर्भपात आणि करिअरशी संबंधित अडचणी सांगितल्या. सूरजवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु 2023 मध्ये त्याची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.