जान्हवी कपूर हिचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, लोकांना आली महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाची थेट आठवण, अखेर..

Janhvi Kapoor Video : बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. जान्हवी कपूर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. जान्हवी कपूरचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात.

जान्हवी कपूर हिचा तो व्हिडीओ तूफान व्हायरल, लोकांना आली महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाची थेट आठवण, अखेर..
janhvi kapoor
| Updated on: May 17, 2024 | 12:52 PM

जान्हवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूरचा बवाल चित्रपट रिलीज झाला. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत तिरूपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहचली होती. यावेळीचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले.

जान्हवी कपूर ही सतत तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. हेच नाही तर जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. जान्हवी कपूर ही कायमच शिखर पहाडिया याच्यासोबत स्पाॅट होताना दिसते. जान्हवी आणि शिखर पहाडिया हे शाळेपासूनच एकत्र होते, त्यांच्या रिलेशनला बरीच वर्षे झाली आहेत.

आता नुकताच जान्हवी कपूर ही तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आलीये. जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये धमाकेदार डान्स करताना जान्हवी कपूर दिसंतय. विशेष म्हणजे लोकांना जान्हवी कपूर हिचा हा डान्सचा व्हिडीओ प्रचंड आवडतोय, लोक जान्हवीच्या डान्सवर फिदा झाल्याचे बघायला मिळतंय.

या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही देखा तेनु पहली पहली ही बार या गाण्यावर डान्स करत आहे. विशेष म्हणजे जबरदस्त स्टॅप्स करताना जान्हवी दिसतंय. या व्हिडीओवर कमेंट करून एकाने म्हटले की, हिरामंडीच्या आलमजेबच्या भूमिकेसाठी जान्हवी परफेक्ट झाली असती. लोक मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर कमेंट करत आहेत.

हेच नाही तर अनेकांना जान्हवी कपूर हिचा हा व्हिडीओ पाहून थेट शिखर पहाडिया याचीच आठवण झालीये. जान्हवी कपूर कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच एक मुलाखत जान्हवी कपूर हिने दिली. या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर ही आपल्या होणाऱ्या पतीबद्दल बोलताना दिसली. तिला होणाऱ्या पतीकडून कोणत्या अपेक्षा आहेत, हे सांगताना जान्हवी दिसली.