
Karisma Kapoor Post: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिचा पूर्व पती संजय कपूर (Sunjay Kapur) याचं 12 जून रोजी निधन धाले आहे. संजय आणि करिश्मा 2016 मध्येच विभक्त झाले होते. पण मुलांसाठी दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. संजय याच्या मृत्यूनंतर करिश्माने दोन्ही मुलांना वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्ली येथे नेलं होतं. 19 जून रोजी संजय याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. सोशल मीडियावर करिश्मा आणि तिच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाले होते.
दरम्यान, पूर्व पती संजय कपूर याच्या निधनानंतर 25 जून रोजी करिश्मा हिचा वाढदिवस होता. अभिनेत्रीने वाढदिवस साजरा केला नाही. शिवाय कोणते फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले नाही. पतीचं निधन आणि वाढदिवसानंतर करिश्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत करिश्मा म्हणाली, ‘तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार…’ अभिनेत्रीने पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी पोस्ट पूर्व पतीचं निधन आणि वाढदिवसाशी जोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिची चर्चा रंगली आहे.
करिश्मा तिच्या पूर्व पतीच्या निधनानंतर तिच्या मुलांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीची बहीण करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी तिला खूप पाठिंबा दिला. संजयच्या अंत्यसंस्कार आणि प्रार्थना सभेत दोघेही करिश्मासोबत उभे होते.
करिश्मा आणि संजय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता अभिषक बच्चन याच्यासोबत साखरपुडा मोडल्यानंतर करिश्माने कुटुंबियांच्या सहमतीने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. मुलांच्या जन्मानंतर देखील दोघांमधील वाद शमले नाही.
करिश्मा हिने संजय कपूर आणि त्याच्या कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले. एवढंच नाही तर, संजय याने देखील करिश्मावर गंभीर आरोप केले. करिश्माने फक्त माझ्या पैशांसाठी माझ्यासोबत लग्न केलं… असे आरोप संजय याने केले. 2003 मध्ये करिश्मा आणि संजय यांचं लग्न झालं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. 2016 मध्ये करिश्मा आणि संजय यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.