‘व्हर्जिन बायको नका शोधू कारण…’, खरंच प्रियांका चोप्रा असं म्हणालीये, काय आहे सत्य?
Priyanka Chopra: 'व्हर्जिन बायको नका शोधू कारण...', पुरुषांना प्रियांका चोप्राने खंरच दिलाय असा सल्ला, काय आहे सत्य स्वतः अभिनेत्री म्हणाली..., प्रियांका कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

Priyanka Chopra: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या एका पोस्टमुळे चर्चेत असते. आता देखील एका पोस्टमुळे प्रियांका चर्चेत आली आहे. सध्या जी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ते वक्तव्य प्रियांका हिने केलं असल्याचं सर्वांना वाटत आहे. पण सोशल मीडियावर पोस्ट करत मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही… असं स्पष्टीकरण प्रियांका हिने दिलं आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ‘पुरुषांनी व्हर्जिन बायको शोधू नये…’, याच पोस्टमुळे सध्या प्रियांका चर्चेत आली आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
प्रियांकाच्या नावावर सध्या एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आहे की, प्रियांका हिच्या म्हणण्यानुसार, ‘बायकोच्या रुपात कधीच व्हर्जिन मुलीचा शोध घेवू नका. चांगलं आचरण असणारी मुलगी शोधा. व्हर्जिनिटी एका रात्रीत नष्ट होता पण शिष्टाचार कायम सोबत राहतो…’ असं पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.
View this post on Instagram
पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मी असं वक्तव्य केलेलं नाही असं प्रियांका म्हणाली. ‘ती मी नाही… माझं कोट माझा आवाज नाही. ऑनलाईन दिसत आहे, म्हणून ते सत्य आहे असं होत नाही. बनवाट कंटेंट व्हायरल करणं आता सोपं झालं आहे. या दाव्याशी संबंधित कोणतेही दुवे, स्रोत किंवा ऑनलाइन काहीही नाही. अशा कंटेंटची उलटतपासणी करण्यासाठी एक मिनिट काढा आणि स्क्रोल केल्यानंतर तुम्ही वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. ऑनलाइन सुरक्षित रहा.” असं आवाहन प्रियांकाने चाहत्यांना केलं आहे.
प्रियांकाने स्पष्टीकरण दिल्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्रीचं कौतुक होत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘याबाबतीत सांगितल्यामुळे धन्यावाद’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अन्य सेलिब्रिटींनी देखील याबाबत सांगितलं पाहिजे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रियांका चोप्रा हिची चर्चा रंगली आहे.
प्रियांका चोप्राचा आगामी सिनेमा
प्रियांका चोप्रा हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, प्रियांका ‘हेड ऑफ स्टेट’ मध्ये दिसणार आहे, हा एक अॅक्शन-कॉमेडी सिनेमा आहे ज्यामध्ये इद्रिस एल्बा आणि जॉन सीना देखील आहेत आणि इल्या नॅशुलर दिग्दर्शित आहेत.
