जिवंत राहायचे नव्हतं, स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण…, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
जिवंत राहायचे नव्हतं, स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण..., आयुष्यातील कठीण काळाबद्दल अभिनेत्रीने सोडलं मौन, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्स वर्षाव करतात. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर राज्य करणारी शमा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. देबीना बॅनर्जीच्या पॉडकास्टमध्ये शमा हिने स्वतःच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाचा खुलासा केला. शिवाय अभिनेत्रीने स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला होता.
मुलाखतीत शमा हिने सांगितलं होतं की, जेव्हा अभिनेत्री डिप्रेशन आणि बायपोलर डिसऑर्डरचा सामना करत होती. तेव्हा अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून देखील दूर होती. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने स्वतःला संपवण्यचा देखील प्रयत्न केला होता.
शमा म्हणाली, ‘मला बायपोलर डिसऑर्डर होतं. मी स्वतःसाठी एक दुःखद जग निर्माण केलं होतं. डिप्रेशनच्या विश्वात मी गेली होती. मी अनेक संकटांचा सामना केला आहे. माझ्या वाट्याला प्रचंड नैराश्य आलं होतं आणि मनोरंजन क्षेत्र देखील माझं नावडतं झालं होतं. मला वाटायचं इंडस्ट्रीमधील लोकं प्रचंड स्वार्थी आहेत. मी प्रचंड त्रस्त होती.’
View this post on Instagram
‘माझी अवस्था प्रचंड वाईट झाली होती. मला झोपण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत होत्या. एक तर गोळ्यांचं प्रमाण जास्त झालं होतं. मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण मी वाचली. तेव्हा मला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा माझं वजन देखील वाढलं होतं. कोणी मला उचलू देखील शकत नव्हतं इतकं माझं वजन वाढलं होतं.’
‘शुद्धीवर आल्यानंतर मला वाटलं मी का जिवंत राहिली. मला जगायची इच्छाच नव्हती. त्यानंतर मी बायपोलर डिसऑर्डरची थेरेपी घेतली. काही वर्ष मी पूर्णपणे हरवली होती. मी रागीट झाले होते. त्यामुळे मला वाटायचं की मानसिक आरोग्याबद्दल जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
आता शमा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
