‘या’ क्रिकेटरसोबत माधुरी दीक्षित हिची ‘अधुरी प्रेमकहाणी’, ब्रेकअपचं कारण ऐकून व्हाल थक्क

एकेकाळी प्रसिद्ध क्रिकेटरच्या प्रेमात होती 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित; मग का पूर्ण नाही झाली त्यांची 'लव्हस्टोरी'... आजही माधुरीच्या आयुष्यातील तो किस्सा चर्चेत

या क्रिकेटरसोबत माधुरी दीक्षित हिची अधुरी प्रेमकहाणी, ब्रेकअपचं कारण ऐकून व्हाल थक्क
| Updated on: Mar 10, 2023 | 3:26 PM

Madhuri Dixit Ajay Jadeja Incomplete Love Story : बॉलिवूडमध्ये आज अनेक मोठं बदल झाले, पण ९० च्या दशकातील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल कायम चर्चा रंगत असतात. एवढंच नाही तर, बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटर यांच्यातील प्रेमसंबंधांच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अनेक अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंनी लग्न करत त्यांच्या नात्याला पत्नी – पत्नीचं नाव दिलं. पण काहींची प्रेमकहाणी मात्र अधुरीच राहिली. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे माधुरी दीक्षित. आज माधुरी डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीचं नाव क्रिकेटर अजय जडेजा यांच्यासोबत जोडण्यात आलं.

रिपोर्टनुसार, जेव्हा माधुरी दीक्षितने माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांना सिनेमात भूमिका मिळवून देण्यासाठी अनेक बॉलिवूड निर्मात्यांसोबत संपर्क केला होता. एवढंच नाही तर, माधुरीला अजय जडेजा यांच्यासोबत लग्न देखील करायचं होतं. अशी देखील तुफान चर्चा रंगली. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या.

माधुरी ८० – ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. लग्नानंतर परदेशात शिफ्ट होण्यापूर्वी माधुरी हिचं नाव संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. शिवाय अजय जडेजा यांच्यासोबत रंगणाऱ्या नात्याच्या चर्चा फक्त अफवा असल्याचं देखील सांगण्यात आलं.

माधुरी आणि अजय यांची ओळख फिल्मफेअर फोटोशूट दरम्यान झाली. फोटोशूटसाठी दोघांनी रोमांटिक पोज दिल्या होत्या. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. सर्वकाही उत्तम सुरु असताना त्यांच्या नात्यात वाद होवू लागल्याची माहिती समोर आली. अजय जडेजा यांच्या क्रिकेट कामगिरीत मोठे नकारात्मक बदल झाले. शिवाय त्यांचं नातं तुटण्यामागे कुटुंबिय असल्याचं रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय जडेजा राजघराण्यातील होते. तर माधुरी ब्राह्मण मध्यमवर्गीय कुटुंबातली. म्हणून अजयच्या कुटुंबीयांना दोघांचं नातं मान्य नव्हतं. अशा परिस्थितीत माधुरी दीक्षितच्या कुटुंबीयांनी देखील त्यांच्या नात्याला विरोध केला. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगू लागली. अखेर माधुरीने डॉ.श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले आणि अमेरिकेत गेली. अनेक वर्षांनंतर माधुरी पुन्हा मुंबईमध्ये आली आहे.

तर दुसरीकडे अजय जडेजा यांनी प्रसिद्ध राजकारणी जया जेटली यांची मुलगी आदिती जेटली यांच्यासोबत लग्न केलं. अजय आणि अदिती यांनी दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलाचं नाव ऐमान आणि मुलीचं नाव अमिरा असं आहे.