दिग्गज क्रिकेटपटूला डेट करतेय मलायका अरोरा? IPL 2025 सामन्यातील एक फोटो तुफान व्हायरल

Malaika Arora New Boyfriend: अर्जुन कपूरनंतर मलायका अरोराच्या आयुष्यात 'या' दिग्गज क्रिकेटपटूची एन्ट्री? IPL 2025 सामन्यातील 'त्या' एका फोटोमुळे रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण, मलायका कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

दिग्गज क्रिकेटपटूला डेट करतेय मलायका अरोरा? IPL 2025 सामन्यातील एक फोटो तुफान व्हायरल
| Updated on: Mar 31, 2025 | 11:34 AM

Malaika Arora New Boyfriend: IPL सामना म्हटलं तर, असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण येतं. रविवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये राजस्थानने 6 धावांनी विजय मिळवला आणि CSK संघाला पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, रविवारच्या सामन्यापेक्षा अभिनेत्री मलायका अरोराच्या एका फोटोमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. चेन्नई-राजस्थान सामन्यादरम्यान मलायका अरोरा हिला एका दिग्गज क्रिकेटरसोबत स्पॉट करण्यात आलं.

मलायका हिला ज्या क्रिकेटरसोबत स्पॉट करण्यात आलं आहे, तो क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नाही तर, श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा आहे. सध्या स्टेडियममधील दोघांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो समोर आल्यामुळे मलायाक आणि कुमार संगकारा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

 

 

फोटो पाहिल्यानंतर एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिलं आहे की, मलायकाचा राजस्थान रॉयल्स संघाशी कोणताही संबंध नाही, तरीही तिने संघाची जर्सी घालणं आणि संगकारासोबत दिसणं हे निश्चितपणे काही संकेत देत आहे. पण यावर दोघांपैकी कोणीही अधिकृत वक्तव्य केलं नाही.

सांगायचं झालं तर, मलायका कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेच असते. अभिनेता अर्जुन कपूर याला अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ‘आता मी सिंगल आहे…’ अशी कबुली अर्जुन कपूर याने सर्वांसमोर दिली. पण मलायका अद्याप अर्जुन कपूर याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपवर वक्तव्य केलेलं नाही. पण अभिनेत्री कायम सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट करताना दिसली.

मलायका अरोरा आणि अरबाज खान

मलायका – अरबाज यांचं लग्न 12 डिसेंबर 1998 मध्ये झालं. लग्नानंतर मलायकाने मुलाला जन्म दिला. अरबाज – मलायका यांच्या मुलाचं नाव अरहान असं आहे. मुलाच्या जन्मानंतर देखील मलायका – अरबाज यांच्यामध्ये वाद होत राहिले. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये मलायका – अरबाज यांनी घटस्फोटाची घोषणा केली.