
Actress Life: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. अशाच एका अभिनेत्री पैकी एक अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री कुनिका सदानंद. एका मुलाखतीत कुनिकाने विवाहित गायक कुमार सानू यांच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने सिचुएशनशिप आणि वन-नाईट स्टँडबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. ‘मी माझ्या शरीराचा वाईट वापर कधीच होऊ देणार नाही…’ असं वक्तव्य अभिनेत्रीने एका मुलाखतीत केलं होतं.
रिलेशनशिपबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मी कधीच वन-नाईट स्टँडसाठी नातं मर्यादीत ठेवलं नाही. रिलेशनशिपमध्ये असताना मी कायम त्या व्यक्तीसोबत भविष्याचा विचार केला. मला वन-नाईट स्टँड, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स अशी नाती बिलकूल आवडत नाहीत.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या मनाच्या, माझ्या शारीराचा इतका आदर करते की, मी माझ्या शारीराचा वाईट वापर होऊ देणार नाही. जर सर्व गोष्टींमध्ये मी असेल तर, ते सर्वकाही भविष्यासाठी असायला हवं आहे. जर नात्याचा अंत झाला तर, त्यांच्या आठवणींच्या आधारावर मी आयुष्य जगू शकते…’
गायक कुमार सानू यांच्यासोबत कुनिका होती रिलेशनशिपमध्ये…
एका मुलाखतीत खुद्द कुनिकाने कुमार सानू यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं होतं. पहिल्या मुलाखतीतच अभिनेत्रीचा कुमार सानू यांच्यावर जीव जडला होता. अभिनेत्री म्हणाली, ‘एकदा मी उटी याठिकाणी शुटिंग करत होती, तेव्हा गायक तेथे सुट्ट्यांसाठी आले होते.’
‘कुमार सानू यांचे पत्नी रीता यांच्यासोबत वाद सुरु होते तेव्हा ते बहिणीच्या कुटुंबासोबत उटी याठिकाणी आले होते. आम्ही एकत्र बसून ड्रिंक देखील केली. त्यानंतर कुमार सोनू खिडकीतून उडी मारणार होते. तेव्हा आम्ही त्यांना खाली उतरवलं. त्या घटनेनंतर आमचं नातं अधिक घट्ट झालं..’
रिपोर्टनुसार, घरी पतल्यानंतर कुमार सानू पत्नीपासून वेगळे झाले आणि कुनिकासोबत त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. दोघांनी एकमेकांना जवळपास 5 वर्ष डेट केलं. पण त्यांनी कधीच नात्याची कबुली सर्वांसमोर दिली नाही. नात्याबद्दल कुनिका म्हणाली, ‘मी त्यांच्यासाठी त्यांच्या पत्नीप्रमाणे होती… मी देखील त्यांना पती मानलं होतं…’ पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.