Manoj Kumar Death: रुद्राक्ष, साईबाबांची विभूती आणि…, मनोज कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी रवीनाने आणल्या 3 गोष्टी

Manoj Kumar Death: मनोज कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचली रवीना भावूक होत म्हणाली, 'त्यांच्यासाठी त्यांच्या तीन आवडत्या गोष्टी आणल्या आणि...', अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा

Manoj Kumar Death: रुद्राक्ष, साईबाबांची विभूती आणि..., मनोज कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी रवीनाने आणल्या 3 गोष्टी
| Updated on: Apr 05, 2025 | 10:25 AM

Manoj Kumar Death: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मनोज कुमार यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. अनेक सेलिब्रिटींनी मनोज कुमार यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं असून अनेक जण त्यांच्या अंत्यदर्शनासाठी देखील पोहोचले आहेत. दरम्यान, अभिनेत्री रवीना टंडन दिवंगत अभिनेते मनोज कुमार यांच्यासाठी तीन गोष्टी घेवून पोहोचली आहे. अभिनेत्रीने यावेळी मनातील भावना देखील व्यक्त केल्या.

मनोज कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेली रवीना टंडन खूपच भावूक दिसत होती. बॉलीवूडच्या ‘भारत कुमार’ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ती महाकालचा रुद्राक्ष, साईंची विभूती आणि भारताचा ध्वज घेऊन आली होती. यावेळी अभिनेत्रीने ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्याशी संबंधित अनेक आठवणी देखील ताज्या केल्या.

रवीना टंडन म्हणाली, ‘मी मनोज काका यांना लहानपणापासून ओळखत आहे. ‘बलिदान’ सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी माझ्या वडिलांना ब्रेक दिला. ते माझ्यासाठी माझ्या वडिलांसारखे आहेत. माझ्यासाठी भारत होते, भारत आहेत आणि भारत राहतील… त्यांच्यासारखे देशभक्तीपर सिनेमे कोणी बनवले नाहीत आणि कोणी बनवू शकणार नाहीत.’

 

 

‘माझ्यात लहानपणापासून जी काही देशभक्ती आहे, ती कदाचित त्यांच्या आणि माझ्या वडिलांकडून आणि त्यांच्या सिनेमातून आली असावी. आणखी एक घटना, कोणीतरी मला सांगत होतं की जेव्हा त्यांनी शहीदमध्ये भगतसिंग यांची भूमिका केली तेव्हा बाकीचे लोक बसले होते आणि सर्वजण धूम्रपान करत होते.’

‘त्यावेळी मनोज कुमार भगतसिंग यांच्या भूमिकेत होते आणि जेव्हा त्यांना कोणीतरी सिगारेट ऑफर केली तेव्हा ते म्हणाले की जोपर्यंत माझ्या डोक्यावर ही सरदार पगडी आहे तोपर्यंत मी अशा कोणत्याही गोष्टीला हात लावणार नाही.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘ही देशभक्त मनातून हवी असते. ते देशभक्त होते. महाकालचे भक्त होते. साईाबाबाचे भक्त होते. आज मी त्यांच्या तीन आवडत्या गोष्टी आणल्या आहेत.. देशाचा राष्ट्रध्वज, साईबाबांची विभूती आणि महाकालचा रुद्राक्ष. या तीन गोष्टी त्याच्या हृदयाच्या जवळ होत्या आणि माझ्याही खूप जवळ आहेत.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.