अभिनेत्रीने केला निर्मात्यावर २४ लाखांच्या फसवणुकीचा आरोप, विश्वासघात केल्याने एफआयआर दाखल

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला नेकलेस घातल्यामुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री रुची गुर्जर हिने निर्मात्यावर फसवणूकीचा आरोप करीत एफआयआर दाखल केला आहे.

अभिनेत्रीने केला निर्मात्यावर २४ लाखांच्या फसवणुकीचा आरोप, विश्वासघात केल्याने एफआयआर दाखल
Bollywood actress Ruchi Gurjar
| Updated on: Jul 25, 2025 | 9:58 PM

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल रुची गुर्जर हीने निर्माता करण सिंह चौहान यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आपल्याला मालिका काढतो असे सांगत आपल्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन प्रत्यक्षात ते पैसे दुसऱ्याच एका प्रोजक्टसाठी वळवल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. आपल्याकडून घेतलेले पैसे परत मागितले असताना निर्मात्याने आपल्याला धमक्या दिल्याचाही आरोप रुची गुर्जर हीने केला आहे.

कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लॉकेट गळ्यात घालून रेड कार्पेटवर चालून चर्चेत आलेल्या अभिनेत्री रुची गुर्जर हीने आता निर्माता करण सिंह चौहान यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ओशिवरा पोलिसांत तिने एफआयआर दाखल केला आहे. करण सिंह चौहान यांनी आपली आर्थिक फसवणूक केली. तसेच विश्वासघात केला आणि आपल्याला धमक्या दिल्याचा आरोप तिने केला आहे.

एफआयआरनुसार, रुची हीने निर्मात्यावर आरोप आहे की जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान, तिने तिच्या फर्म एसआर इव्हेंट्स अँड एंटरटेन्मेंटमधून अनेक हप्त्यांमध्ये करण सिंह चौहान यांच्या कंपनी के स्टुडिओ आणि इतरांशी जोडलेल्या विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केली होती. चौहानने सोनी टीव्हीवर हिंदी मालिका सुरू करत असल्याचा दावा केल्यानंतर आपण हे पैसे गुंतवले होते असे रुची गुर्जर हिने म्हटले आहे. आरोपी चौहान याने तिला सह-निर्मात्याची भूमिका देऊ केली आणि प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे देखील शेअर केली होती.

मालिका प्रत्यक्षात आलीच नाही

पोलिसांनी रुचीच्या तक्रारीवरून २४ जुलै २०२५ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४), ३५२ आणि ३५१ (२) अंतर्गत ओशिवरा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे. रुचीने पोलिसांना सांगितले की निर्मात्याने सुरुवातीला व्हॉट्सअपद्वारे तिच्याशी संपर्क साधला होता आणि स्वतःला कार्यक्रम संचालक असल्याचा दावा केला होता. आपण अनेक वेळा पाठपुरावा करूनही, निर्मात्याने वचन दिलेली मालिका प्रत्यक्षात आलीच नाही. तसेच आपल्या फोनला चौहान यांनी टाळत काही बोलण्यास नकार दिला.

नेकलेस घातल्याने चर्चेत

मात्र त्यानंतर, आपल्याला आढळले की तिचे पैसे कथितपणे २७ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या “सो लॉन्ग व्हॅली” नावाच्या चित्रपट प्रकल्पात वळवण्यात आले आहेत.जेव्हा तिने तिच्या पैशांच्या परतफेडीबद्दल त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा चौहानने तिला धमकावण्यास सुरुवात केली. रुची गुर्जर हिने यापूर्वी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेला नेकलेस घातल्यामुळे ती चर्चेत आली होती.