
बॉलिवूड अभिनेत्री आणि शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा गेल्या काही महिन्यांपासून तूफान चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले असून मागील काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, सोनाक्षी तिच्या आणि जहीरच्या पहिल्या बाळाला जन्म लवकरच देणार आहे. मात्र, सोनाक्षीने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, मी गेल्या 16 महिन्यांपासून प्रेग्नंट असल्याचे सांगितले जाते. सोनाक्षीने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे जाहीर करताच सर्वांना मोठा धक्का बसला होता. सोनाक्षीने जहीरसोबत सिव्हिल मॅरेज केले. विशेष म्हणजे तिच्या या लग्नात तिचे आई वडील तिच्यासोबत ठामपणे उभे होते. सोनाक्षी लग्नानंतर मुस्लिम धर्म स्वीकारणार का? अशा विविध चर्चा त्या दरम्यान रंगताना दिसल्या.
आता लग्नाच्या 16 महिन्यांनंतर सोनाक्षी सिन्हा हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. सोनाक्षी म्हणाली की, मला एक विश्वास आहे की, प्रेम कायमच जिंकते. मग काहीही असो. लोक जरी तुमचा व्देश करत असतील तरीही तिथे प्रेम असते आणि ते जिंकत असते. माझा यावर ठामपणे विश्वास आहे. मी फक्त प्रयत्न केली. मला लोक म्हणतात की, तू खूप जास्त धाडसी आहेस. तू फक्त तुझे ऐकले आणि त्याच्यासोबत लग्न केले.
पुढे सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, मी अशा व्यक्तीसोबत लग्न केले, ज्याच्यावर मी प्रेम केले. मुळात म्हणजे मी काही मुद्दाम वगैरे हे सर्व केलेले नाही. या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची लव्ह स्टोरी फार कमी लोकांना माहिती होती. दोघांची पहिली भेट सलमान खानच्या घरातील एका पार्टीत झाली आणि पहिल्याच भेटीमध्ये दोघे कितीतरी तास गप्पा मारत होते.
सोनाक्षीने जहीरसोबत लग्न करत असल्याचे जाहीर करण्याच्या अगोदर यांच्या नात्याबद्दल लोकांना फार काही माहिती नव्हते. सोनाक्षीने अनेक वर्ष जहीरला डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. जहीर इक्बाल याने काही चित्रपटांमध्ये काम केले. जहीर हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक असून मुंबईमध्ये ते अत्यंत आलिशान अशा घरात राहतात. कायमच सोनाक्षी जहीरसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.