बाबरीच्या जागेवर राम मंदिर झाल्याने प्रचंड दु:ख झाले… अभिनेत्री स्वरा भास्करचे थेट विधान, म्हणाली, मुस्लिम मित्रांची मी माफीही..
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नुकताच वादग्रस्त विधान केले. अभिनेत्रीच्या विधानाने मोठी खळबळ उडाली. अभिनेत्रीने थेट म्हटले की, मला हिंदू असल्याने लाज वाढत असल्याचेही तिने म्हटले. लोक तिला तूफान टीका करताना दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नुकताच एक धक्कादायक विधान केले. अभिनेत्रीच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. हेच नाही तर कोर्टाने राम मंदिराबद्दल दिलेल्या निकालानंतर मी माझ्या मुस्लिम मित्रांची माफी मागितल्याचे मोठे विधान स्वरा भास्कर हिने केले. स्वरा भास्कर हिने केलेल्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले. स्वरा भास्कर हिने म्हटले की, सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमीबद्दल दिलेल्या निकालानंतर हिंदू म्हणून मला खूप जास्त अपमानित वाटले. त्यानंतर मी तात्काळ, सलमान खान, अमिर खान, शाहरूख खान या माझ्या सर्व मुस्लीम मित्रांना फोन करून माफी मागितली. द मिडनाईट आवर पॉडकास्ट यांना बोलताना स्वरा भास्कर यांनी म्हटले की, मी या निर्णयाने खूप जास्त नाराज होते. मला त्रास झाला. मला हा कोर्टाचा निर्णय अजिबात पटला नाही.
माझ्या मु्स्लीम मित्रांना कळाले पाहिजे की, या कोर्टाच्या निर्णयासोबत मी सहमत नाही. त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयानंतर मी तात्काळ आमिर खान, सलमान खान आणि शाहरूख खान यांना फोन केला. मी त्यांच्यासोबत संपर्क करून माफीही मागितली. मी त्यांना मेसेजे केला. त्या मेसेजमध्ये मी लिहिले की, एक हिंदू असलेल्या नात्याने मी फक्त इतके म्हणू शकते की, मला खरोखरच अपमानित वाटतंय आणि मी या निर्णयाला अजिबात सहमत नाही.
स्वरा भास्कर हिचे हे बोलणे ऐकून लोक तिला खडेबोल सुनावत आहेत. एका युजर्सने स्वराचा क्लास घेत म्हटले की, राम मंदिराचा निर्णय आल्यानंतर हिला वाईट वाटते, ती त्रस्त होते. काम मिळवण्यासाठी ही दिवसरात्र बॉलिवूडवाल्यांचे काैतुक करते. पण असे केल्याने काही काम मिळत नाही. चर्चेत राहण्यासाठी काहीही करत आहे.
अजून एकाने लिहिले की, खरोखरच हिला हिंदु म्हणताना अपमान वाटत आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वरा भास्कर अशाप्रकारचे विधाने करताना दिसत आहे. स्वरा भास्कर हिच्या या विधानाने खळबळ उडाली. लोक तिच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. स्वरा भास्कर हिला पाहूनही अनेकांनी जोरदार टीका केली.