मुस्लीम धर्म पाळत नाही, भगवान शंकराची मात्र निस्सीम भक्त; सारा खाननंतर ‘ही’ अभिनेत्रीही ट्रोल?

अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जी मुस्लिम असूनही, हिंदू देवतांबद्दल आस्था ठेवते आणि पूजा करते. ही अभिनेत्री भगवान शंकरांची निस्सीम भक्त आहे. ही अभिनेत्री सारा खानपेक्षाही महादेवाची मोठी भक्त आहे. दरम्यान ही अभिनेत्री मुस्लीम धर्म न पाळता भगवान शंकरांची आराधना करते. मात्र यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

मुस्लीम धर्म पाळत नाही, भगवान शंकराची मात्र निस्सीम भक्त; सारा खाननंतर ही अभिनेत्रीही ट्रोल?
| Updated on: Jan 26, 2025 | 4:29 PM

असे अनेक बॉलिवूड स्टार आहेत जे मुस्लीम धर्माचे असूनही हिंदू देवतांचीही तेवढीच मनोभावे पूजा करतात. जस की शाहरूख खानच्या घरी दोन्ही धर्मांचं पालन केलं जात. हिंदू देवतांचीही पूजा केली जाते कारण शाहरूख खानची पत्नी गौरी खान ही हिंदू आहे.

त्याच पद्धतीने बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान हिची भगवान शंकरावर मोठी श्रद्धा आहेसाराचे वडील सैफ मुस्लिम आहे, आणि तिची आई अमृता सिंग हिंदू आहे. याच कारणामुळे सारा दोन्ही धर्मांवर विश्वास ठेवते. इतकचं नाही तर सारा भगवान शंकरांची मोठी भक्त देखील आहे.

धर्माने मुस्लीम पण भगवान शंकरांची निस्सीम भक्त

याप्रमाणे अशीच एक सेलिब्रिटी आहे. जी धर्माने मुस्लीम असली तरी त्या धर्माचे पालन करत नाही. ही अभिनेत्री भगवान शंकरांची निस्सीम भक्त आहे. 400 पायऱ्या चढून कानाकोलार टेकडीवरील भोलेनाथाचे दर्शन आवर्जून घेते. ही अभिनेत्री म्हणजे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद.

उर्फी नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या कपड्यांच्या फॅशनबद्दल वेगळं काही सांगायला नको. चित्र विचित्र आऊटफिट घालून उर्फी फोटोशूट करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यातून ती बक्कळ कमाई करते.तिच्या कपड्यांची ही विचित्र स्टाइल म्हणजे तिची ओळख आहे.

 400 पायऱ्या चढून भोलेनाथाचे दर्शन घेतलं

उर्फी ही मुस्लीम असली तरी ती धर्माचे पालन करत नाही. उर्फी भगवान शंकरांची मोठी भक्त आहे. उर्फीने नुकतेच कानाकोलार टेकडीवर असलेल्या कंबेश्वर महादेवाच्या मंदिराचा जाऊन दर्शन घेतलं आहे. या मंदिरापर्यंत पोहोचायला 400 पायऱ्या चढाव्या लगतात असं म्हटलं जातं. शिवभक्त असलेल्या उर्फीने 400 पायऱ्या चढून भोलेनाथाचे दर्शन घेतलं.


फोटो अन् व्हिडीओमुळे उर्फी ट्रोल 

उर्फीने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत उर्फी भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री कुर्ता पायजमा घातलेला दिसत आहे. 27 वर्षांची उर्फी 170 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून ती कोट्यावधींची कमाई करते.

दरम्यान या व्हिडीओवरून उर्फीला सोशल मीडियावर अनेक जण ट्रोल करत आहेत. तर, अनेकांनी कौतुकही केलं आहे. तसेच मुस्लीम असूनही भगवान शंकरांची भक्त असलेल्या आणि त्यांचू पूजा करणाऱ्या सारा खाननंतर आता उर्फीलाही ट्रोल करण्यात येत आहे.