ना खान,ना कपूर, ना बच्चन; हे आहे बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब; एकेकाळी फळे विकायचे, आज हजारो कोटींची संपत्ती

बॉलिवूडमधील सर्वात नावाजलेली, इंडस्ट्रीवर राज्य करणारी श्रीमंत घराणी म्हटलं कपूर, बच्चन आणि खान ही नावे समोर येतात.  पण हे कदाचित कोणाला माहित असेल की बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब दुसरचं आहे. ज्यांची संपत्ती आणि नाव हे या कुटुंबापेक्षाही मोठे आहे. कोण आहे हे कुटुंब? 

ना खान,ना कपूर, ना बच्चन; हे आहे बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब; एकेकाळी फळे विकायचे, आज हजारो कोटींची संपत्ती
Bollywood's Richest Family: T-Series
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Oct 08, 2025 | 1:11 PM

बॉलिवूडमध्ये अनेक असे परिवार आहेत ज्यांचे नाव हे इंडस्ट्रीमध्ये अगदी वर्षानुवर्षे चालत आहेत. मग ते खान कुटुंब असो, कपूर कुटुंब असो किंवा बच्चन कुटुंब असो. तसेच या कुटुंबातील प्रत्येक पिढ्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

खान, बच्चन किंवा कपूर कुटुंब नाही तर हे कुटुंब पॉवरफूल 

बॉलीवूडच्या श्रीमंत कुटुंबांचा विचार केला तर बच्चन, कपूर कुटुंब ही नावे पहिली येतात. कारण या कुटुंबाबद्दल सर्वांनाच माहित आहे. या कुटुंबांचे इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे या ही तिनही कुटुंबे इंडस्ट्रीतील सर्वात पॉवरफूल कुटुंब असल्याचं म्हटलं जातं. पण असं नाहीये. खान, बच्चन किंवा कपूर कुटुंब ही कुटुंब इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखली जात असली तरी त्यांच्यापेक्षा असं एक कुटुंब आहे ज्याचं स्थान यांच्यापेक्षाही मजबूत आहे. या कुटुंबाने यशस्वीरित्या स्वतःला स्थापित केले आहे आणि कालांतराने त्यांचे उत्पन्न आणि संपत्ती झपाट्याने वाढली आहे.

या कुटुंबाची एकूण  संपत्ती 10,000 कोटी रुपये

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टुडिओ आणि प्रॉडक्शन हाऊस अनेक दशकांपासून चालवणारे कुटुंब दुसरे तिसरे तिसरे कोणी नसून टी-सीरीज आहे. ज्याचे मालक भूषण कुमार आणि कृष्ण कुमार आहेत. हे बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जाते. संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे ही कंपनी चालवते. बॉलीवूडमधील अनेक कुटुंबे खूप श्रीमंत असली तरी, हे कुटुंब संपत्तीच्या बाबतीत आघाडीवर आहेत, त्यांची एकूण संपत्ती 10,000 कोटी रुपये आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 मध्ये सर्व क्षेत्रातील सर्वात श्रीमंत भारतीयांची नावे जाहीर झाली आहेत. या यादीनुसार, भूषण कुमार यांचे कुटुंब सर्वात श्रीमंत कुटुंब बनले आहे.

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब 

या यादीत चित्रपट उद्योगातील असंख्य नावे आहेत, परंतु टी-सीरीज ग्रुप ऑफ कंपन्यांचे मालक भूषण कुमार कुटुंब या यादीत अव्वल स्थानावर आहे. हुरुन यादीने कुटुंबाची एकत्रित संपत्ती जाहीर केली आहे, जी अंदाजे 10,000 कोटी आहे. याचा अर्थ भूषण कुमारचे कुटुंब आता बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे.

एकेकाळी हे पद कपूर कुटुंबाकडे होते पण आाता…

एकेकाळी हे पद कपूर कुटुंबाकडे होते आणि नंतर चोप्रा कुटुंबाकडे होते. यशराज फिल्म्स आणि बीआर फिल्म्सचे मालक असलेले चोप्रा कुटुंब अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत होते. आदित्य चोप्राच्या संपत्तीमुळे कुटुंबाची एकूण संपत्ती 8ooo कोटी इतकी असल्याचा अंदाज आहे, जी टी-सीरीज कुटुंबाच्या संपत्तीपेक्षा थोडी कमी आहे. त्याचप्रमाणे, शाहरुख खानच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 7,500 कोटी इतकी असल्याचे म्हटले जाते.

सुरुवात अशी झाली…

हुरुन रिच लिस्टमध्ये कुमारच्या संपत्तीची वैयक्तिक माहिती देण्यात आलेली नसली तरी, उद्योग क्षेत्रातील जाणकारांचा असा अंदाज आहे की त्यातील चार-पंचमांश भाग एकट्या भूषण कुमारकडून येतो. भूषण कुमारच्या कुटुंबात त्यांची पत्नी दिव्या खोसला कुमार, दोन बहिणी, तुलसी कुमार आणि खुशाली कुमार आणि त्यांचे काका कृष्णा कुमार यांचा समावेश आहे.

भूषण कुमार यांचे वडील गुलशन कुमार यांनी ही कंपनी स्थापन केली. एक काळ असा होता की चित्रपट उद्योगात येण्यापूर्वी, गुलशन कुमार दिल्लीच्या रस्त्यांवर फळे विकणारे फळ विक्रेते होते. जेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांचे दुकान मिळाले तेव्हा त्यांचे नशीब उजळले, जिथे ते चित्रपट गाण्याच्या कॅसेट्स विकायचे. तिथून त्यांनी स्वतःचे रेकॉर्ड लेबल सुरू केले आणि ते उद्योगाच्या मदतीने बॉलिवूडवर राज्य केले.