
Bollywood Actress Life : झगमगच्या विश्वातील अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल चर्चा करत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री हवी तशी भूमिका आणि लोकप्रियता मिळाली नाही… पण तरी देखील तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. शिवाय पैशांसाठी कधी कोणाच्या अंथरुणावर तडजोड केली नाही… असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आहे.
दरम्यान नुकताच झालेल्या मुलाखतीत राखीने आर्यन खान, फराह खान, सलमान खान, शाहरुख खान यांच्याबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं आणि बॉलिवूडबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. राखी म्हणाली, ‘माझ्यावर केस सुरु असल्यामुळे मी गेल्या तीन वर्षांपासून भारतात आली नाही.’ पण आता राखी भारतात आली असून तिने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे.
राखी म्हणते, तिचं आयुष्य फार खडतर आहे. पुन्हा कधी दुसऱ्या राखीचा जन्म नको व्हायला.. यावेळी कमाईबद्दल देखील राखीने मौन सोडलं, ‘डान्स करून मी पैसे जमावले… मी दुबईत मिलियन्स, बिलियन्स कमावत होती… अंबानी आणि टीना अंबानी यांच्या लग्नात मी कॅटरिंग क्लास जॉब करत होती… मी बोल्ड राहत होती. कारण मला माझ्या आईच्या हॉस्पिटलचं बिल भरायचं होतं. भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर होती…’
‘बॉलिवूडमध्ये मी स्वतःला विकलं विकलं ते ही चुकीच्या मार्गाने नाही… मी अंगप्रदर्शन केलं, पण कधी शॉर्टकटची मदत घेतली नाही… पडद्यावर बोल्डनेस दाखवला पण कधी कोणाच्या अंथरुणावर तडजोड केली नाही… असं देखील राखी सावंत म्हणाली.
राखी सावंत म्हणाली, ‘माझी मदत कोणी केली नाही. पैसे द्यायचे आणि म्हणायचे हिला भारतात येऊ नका देवू.. फराह खान माझी शुगर मम्मी आहे, गॉड मदर आहे… शाहरुख खान, सलमान खान.. गॉडफादर आहेत… मी अनाथ आहे, मला वारस नाही. बॉलिवूडने मला सहारा दिला… जनतेने मला प्रेम दिलं… सर्व सेलिब्रिटींनी मला प्रेम दिलं… ‘
माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून मी भारतात येत नव्हते. जर मी दुबईत राहिली असती आणि तिथेच मरण पावली असती तर माझं काय झालं असतं? मी इथे येऊ शकली नसती. मी सर्व खटले माफ केले आणि पुढे गेली… असं देखील राखी सावंत म्हणाली.