29 भागांची सीरिजवरून बनवला चित्रपट, ठरला प्रचंड ब्लॉकबस्टर, थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रचंड गर्दी
29 भागांची प्रचंड दमदार सीरिज, जी एकदा बघायला सुरुवात केली तर प्रेक्षक दिवस-दिवस जागेवरून उठत नाहीत. इतकी क्रेझ की याच सीरिजवर चित्रपट येताच प्रेक्षक थिएटरमध्ये तुटून पडले.

भारतीय डिजिटल मनोरंजनाच्या विश्वात काही कथा अशा असतात, ज्या केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाहीत तर त्या थेट पॉप-कल्चरचा भाग बनतात. बंदुका, राजकारण, सूड आणि सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू असलेली रक्तरंजित लढाई दाखवणारी ‘मिर्झापूर’ ही वेबसीरिजही त्यापैकीच एक. 2018 मध्ये ओटीटीवर सुरू झालेल्या या सीरिजने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता याच विश्वाची कथा मोठ्या पडद्यावर आली असून, सिनेमागृहातही या चित्रपटाने जोरदार कमाई करत नवा विक्रम रचला आहे.
‘मिर्झापूर’च्या तिन्ही सीझनचं दिग्दर्शन करणारे गुरमीत सिंह यांनीच या कथेला फीचर फिल्मचं रूप दिलं आहे. चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि रवि किशन यांसारखे कलाकार पुन्हा एकदा आपल्या गाजलेल्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.
2018 मध्ये झाली होती सुरुवात
‘मिर्झापूर’चा पहिला सीझन 2018 मध्ये प्रदर्शित झाला. या सीझनमध्ये प्रेक्षकांची ओळख कालीन भैया, त्याचा बंडखोर मुलगा मुन्ना भैया आणि गुड्डू-बबलू पंडित या भावांशी झाली. गुड्डू आणि बबलू यांच्या आगमनामुळे पूर्वांचलमधील सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलली. सीझनच्या अखेरीस लग्नाच्या सोहळ्यात झालेल्या रक्तरंजित हत्याकांडाने प्रेक्षकांना धक्का दिला. या सीझनला IMDb वर 8.4 रेटिंग मिळालं.
यानंतर 2020 मध्ये दुसरा सीझन आला. भावाचा आणि पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर गुड्डू पंडित सूडाच्या आगीत पेटून उठतो आणि कालीन भैय्याच्या साम्राज्याला हादरे देतो. दरम्यान, शरद शुक्ला या नव्या पात्राची एंट्री होते आणि सत्तेच्या खुर्चीसाठीची लढाई अधिक गुंतागुंतीची बनते. सीझनच्या शेवटी मुन्ना भैय्याचा मृत्यू आणि कालीन भैय्याचं जखमी होणं हा मोठा टर्निंग पॉइंट ठरला.
29 एपिसोडची कथा अडीच तासांत मांडण्याचं आव्हान
‘मिर्झापूर’चे तब्बल 29 एपिसोड प्रेक्षकांनी पाहिले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या डिजिटल विश्वाला अवघ्या अडीच तासांच्या चित्रपटात मांडणं हे निर्मात्यांसाठी मोठं आव्हान होतं. दिग्दर्शक गुरमीत सिंह आणि लेखक पुनीत कृष्णा यांनी ही जोखीम स्वीकारली.
‘मिर्झापूर’च्या आधीच्या तीन सीझनमुळे चित्रपटाला सुरुवातीपासूनच मोठा फायदा झाला. प्रेक्षकांमध्ये आधीपासून निर्माण झालेली उत्सुकता बॉक्स ऑफिसवरही दिसून आली. चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्ये दमदार कमाई केली आणि अवघ्या 6 दिवसांत भारतात 137 कोटी रुपयांहून अधिक नेट कलेक्शन केल्याचा दावा करण्यात आला आहे.