“सलमान खान ड्रग्स घेतो, आमिर खान विषयी माहित नाही”- वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य, कुणाच्या निशाण्यावर आहेत बॉलीवूड स्टार्स

स्टेजवरून त्यांनी बॉलिवूड अभिनेत्यांची पोलखोल केली. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांची नावं घेत त्यानं मोठं वादग्रस्त विधान केलं.

सलमान खान ड्रग्स घेतो, आमिर खान विषयी माहित नाही- वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य, कुणाच्या निशाण्यावर आहेत बॉलीवूड स्टार्स
Salman Khan Amir Khan Drugs
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 16, 2022 | 11:02 AM

बाबा रामदेव मुरादाबादच्या ड्रग फ्री इंडिया कार्यक्रमात सहभागी झाले होते. व्यसनमुक्त भारताबद्दल बोलताना त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. दरम्यान त्यांनी ड्रग्स आणि नशा याविषयी बोलताना बॉलिवूड स्टार्सवर निशाणा साधला. स्टेजवरून त्यांनी बॉलिवूड अभिनेत्यांची पोलखोल केली. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांची नावं घेत त्यानं मोठं वादग्रस्त विधान केलं. बाबा रामदेव यांनी चित्रपटसृष्टीवर ड्रग्स घेतल्याचा आरोप केला. बाबा रामदेव यांनी चित्रपटसृष्टीवर नशा आणि ड्रग्जचा आरोप करत शाहरुख खान आणि सलमानचं उदाहरण दिलं.

बिडी, सिगारेट किंवा दारू न पिणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असं आवाहन बाबा रामदेव यांनी व्यासपीठावरून सर्वांना केलं.

आर्य समाजाने केलेल्या कार्याची यात सर्वाधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देश जर अमली पदार्थमुक्त झाला तर महर्षि दयानंदजींचे स्वप्न पूर्ण होईल. हे कायद्याने होणार नाही, यासाठी आपल्याला स्वत:च ते करावं लागेल असंही ते म्हणाले.

बाबा रामदेव यांनी बॉलिवूड आणि हिंदी चित्रपटसृष्टीवरही ड्रग्जबाबत जोरदार हल्ला चढवलाय. ते म्हणाले की, यापूर्वी आपण शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज घेतल्यामुळे तुरुंगात जाताना पाहिलंय.

सलमान खान ड्रग्ज घेतो आणि आमिर खानचं माहित नाही. चहूबाजूंनी फिल्म इंडस्ट्रीच्या आत ड्रग्ज आहेत. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज, राजकारणात ड्रग्ज,निवडणुकीच्या वेळी सुद्दा दारूचं वाटप केलं जातं.

ऋषींची भूमी व्यसनमुक्त असायला हवी, असा संकल्प आपण करायला हवा. तसेच व्यसनमुक्तीसाठी चळवळही राबवणार आहोत.

बॉलिवूडच्या ड्रग्जच्या कनेक्शनबद्दल अनेक चर्चा झाल्या आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज कनेक्शनची चर्चा सुरू झाली.

त्यानंतर बॉलिवूड स्टार्स एनसीबीच्या निशाण्यावर आहेत. ड्रग्ज आणि बॉलिवूडवरून राजकारणही चांगलंच तापलं आहे.

गेल्या वर्षी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. मात्र, आर्यनविरोधात कोणताही पुरावा न सापडल्याने या प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.