
Salman Khan : बॉलिवूडचा दबंग स्टार, भाईजान अर्थात सलमान खान याचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. कधी काही वाद, कधी अजून काही, तो सतत लाईमलाईटमध्ये असतो. त्याच्या अनेक जुन्या नात्ायंमुळे सलमान कायम वादात सापडलेला दिसला आहे. आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली ही त्याच्याविरोधात पुन्हा बोलली आहे. सोमी अलीने यापूर्वीही सलामनवर अनेक गंभार आरोप लावले आहे. आता तिचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे, त्यात तिने असा आरोप केला आहे की सलमानने तिला धमकी दिली. तो माझा पाठलाग करतोय, असंही ती म्हणाली आहे.
खरंतर, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये रागावलेल्या सोमी अलीने सलमानवर आरोप केले आहेत. तिने असा दावा केला की, सलमानने तिला एका अनोळखी नंबरवरून फोन केला होता. जर तू माझ्याविरुद्ध काही बोललीस तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्याने दिली, असा आरोप सोमी अलीने केला. एवढंच नव्हे तर त्याने आपल्याला बॉलिवूडमधून बॉयकॉट करण्याचा कट रचल्याचा आरोपही सोमीने केला आहे.
सलमानने फोन करून दिली धमकी
सोमी अलीचा व्हिडीओ समोर आला आहे. “सलमान खान, माझ्या आयुष्यातून गेल्यानंतरही, मला एकटं सोडत नाहीये. तो 2025 मध्येही मला धमकावत आहे. माझा एक्स बॉयफ्रेंड असलेल्या सलमानने मला एका अनोळखी नंबरवरून फोन केला आणि म्हणाला, ‘जर तू माझ्याविरुद्ध काही बोललास तर मी काय करू शकतो हे तुला कळेलच. आणि तो तसं वागलाही. त्याने मला बॉलिवूडमधून बॉयकॉट केलं. बॉलिवूडमधलं कोणीच माझ्याशी बोलत नाही, माझे मित्रही माझ्यापासून दूर पळतात” असा आरोप सोमीने केला.
माझा पाठलागच सोडत नाही
पुढे सोमी म्हणाली की, ” या माणसाने त्याता टीआरपी, त्याचे रेटिंग्स आणि त्याचं सगळं काही गमावलं आहे. आणि आता तो माझ्या आयुष्यात नसला तरी तो माझा पाठलाग सोडत नाहीये, तो मुला बुली करतो. मी या माणसाशी ब्रेकअप केलं, कारण 1998 मध्ये त्याने माझी फसवणूक केली. पण , आता 2025 मध्येही तो दुबईला जाऊन माझ्या कुटुंबियांना भेटतो, तो हे सगळं मुद्दाम करत आहे. त्याला माझा काळजी आहे म्हणून तो हे करत नाही, तर त्याला मला दुखवायची इच्छा आहे,” असे अनेक आरोप सोमी अलीने केले.