10 Years Of Arijit Singh : अरिजित सिंगला बॉलिवूडमध्ये पूर्ण झाली 10 वर्षे, ऐका त्याची काही गाजलेली-प्रसिद्ध गाणी…

आजच्या दिवशीच 10 वर्षांपूर्वी अरिजीतने 'फिर मोहब्बत' या गाण्याद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हे गाणे मोहम्मद इरफान अली आणि त्यांच्यासमवेत सॅम भट यांनी गायले होते. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच अरिजित व्यस्त झाला. त्याची हजारो गाणी रिलीज आणि हिट झाली आहेत.

10 Years Of Arijit Singh : अरिजित सिंगला बॉलिवूडमध्ये पूर्ण झाली 10 वर्षे, ऐका त्याची काही गाजलेली-प्रसिद्ध गाणी...
अरिजित सिंग
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 4:20 PM

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट प्लेबॅक अर्थात पार्श्वगायकांपैकी अरिजित सिंग (Arijit Singh) एक आहे. त्याचे प्रत्येक गाणे लोकांच्या मनाला स्पर्शून जाते. त्याची गाणी लोकांना भावूक करतात. अरिजितची गाणी ऐकताना त्याच्या गाण्यांमध्ये इतके हरवून जायला होते की, त्याचे बोल आपल्याच भावना वाटू लागतात. अरिजितने बॉलिवूडमध्ये नुकतीच 10 वर्षे पूर्ण केली आहेत (10 Years Of Arijit Singh singer musician completes his 10 of career in Bollywood).

आजच्या दिवशीच 10 वर्षांपूर्वी अरिजीतने ‘फिर मोहब्बत’ या गाण्याद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हे गाणे मोहम्मद इरफान अली आणि त्यांच्यासमवेत सॅम भट यांनी गायले होते. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच अरिजित व्यस्त झाला. त्याची हजारो गाणी रिलीज आणि हिट झाली आहेत. त्याचे चाहते अरिजितला संगीताचा गुरु म्हणतात. आपल्या 10 वर्षांच्या कारकीर्दीत त्याने राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. आज, अरिजितच्या बॉलिवूड कारकिर्दीला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या खास निमित्ताने आपण त्याची काही बहारदार गाणी ऐकणार आहोत…

तुम ही हो

‘आशिकी 2’ या चित्रपटाचे ‘तुम ही हो’ हे गाणे सुपरहिट ठरले. हे गाणे अजूनही लोकांच्या ओठांवर आहे. या गाण्यासाठी अरिजितने 9 पुरस्कार जिंकले.

बिनते दिल

संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या ‘बिनते दिल’ या गाण्यासाठी अरिजित सिंग यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे गाणे रणवीर सिंगवर चित्रित करण्यात आले होते.

अगर तुम साथ हो

चन्ना मेरेया

ऐ वतन

ऐ दिल है मुश्किल

सोच ना सके

तेरा यार हूं मैं

हवाएं

अरिजित आता संगीतकार देखील बनला आहे. सान्या मल्होत्राच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पगलेट’ या चित्रपटाचे संगीत त्याने तयार केले आहे. अरिजित सिंगची ही गाणी देखील खूप पसंत केली गेली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांनी संगीतकार म्हणून पदार्पण केल्याची माहिती दिली होती.

(10 Years Of Arijit Singh singer musician completes his 10 of career in Bollywood)

हेही वाचा :

क्रिती सेनॉनने सोशल मीडियावर शेअर केला ‘मिमि’चा लूक, चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता!

PHOTO | ‘स्ट्राँग माइंड अँड सॉफ्ट हार्ट’, हिना खानचा दिलकश ‘पिंकीश’ अंदाज, पाहा फोटो…