AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love story | पहिल्या पत्नीशी घटस्फोटानंतर गुपचुप बांधली बालमैत्रिणीशी लग्नगाठ, वाचा अरिजित सिंगची लव्हस्टोरी

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग (Arijit Singh) यांनी अनेक हिट गाणी दिली आहेत. अरिजितच्या आवाजाचे जगभरात लाखो चाहते आहेत. चाहत्यांना त्याची प्रत्येक गाणी जवळपास तोंडपाठ असतात. पण या प्रसिद्ध गायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुणालाही फारसे काही माहिती नाही.

Love story | पहिल्या पत्नीशी घटस्फोटानंतर गुपचुप बांधली बालमैत्रिणीशी लग्नगाठ, वाचा अरिजित सिंगची लव्हस्टोरी
अरिजित सिंग
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 9:12 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग (Arijit Singh) यांनी अनेक हिट गाणी दिली आहेत. अरिजितच्या आवाजाचे जगभरात लाखो चाहते आहेत. चाहत्यांना त्याची प्रत्येक गाणी जवळपास तोंडपाठ असतात. पण या प्रसिद्ध गायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुणालाही फारसे काही माहिती नाही. याचे कारण म्हणजे अरिजित सिंग स्वत: आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे काहीच बोलत नाही. मात्र, अरिजितचे 2 विवाह झाले आहेत, हे फारच कमी लोकांना माहिती असेल (Love story of famous singer Arijit Singh and his wife Koyal).

अरिजितचे पहिले लग्न 2013 साली गायिका रूपरेखा बॅनर्जीशी झाले होते. रूपरेखा बॅनर्जी अरिजितसोबत गुरुकुलच्या या शोच्या पहिल्या भागामध्ये सहस्पर्धक होती. पण या दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. यानंतरच अरिजितच्या आयुष्यात ‘कोयल’ आली.

गुपचूप उरकले लग्न

घटस्फोटानंतर अरिजित आणि कोयल एकमेकांच्या खूप जवळ आले. दोघेही एकमेकांचे बालपणापासूनचे मित्र होते. एकीकडे अरिजित हृदय तुटले होते, तर दुसरीकडे कोयलचाही घटस्फोट झाला होता आणि तिच्या पदरी एक मुलगा देखील होता. या काळात दोघेही पुन्हा एकमेकांच्या जवळ आले. अरिजितने कोयलशी गुपचूप लग्न केले होते, ज्यात केवळ त्यांचे कुटुंब आणि मनोरंजन विश्वातील जवळचे मित्रच सहभागी झाले होते. आपले लग्न लपविण्याचे कारण स्पष्ट करताना अरिजित म्हणाला की, “बऱ्याच वर्षापूर्वी आमचे लग्न झाले होते, पण त्यानंतर आम्ही आमच्या नातेसंबंधांना एका समारंभात अधिकृतरित्या घोषित केले. मला आयुष्यात खूप त्रास झाला. त्यात माझा पहिला घटस्फोट झाला होता (Love story of famous singer Arijit Singh and his wife Koyal).

अरिजितला आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सार्वजनिकरित्या बोलायला आवडत नाही. एका मुलाखतीत जेव्हा त्याला आपल्या पत्नीबद्दल विचारले गेले, तेव्हा तो म्हणाला की, मला वैयक्तिक आयुष्यावर बोलणे आवडत नाही. सोशल मीडियावरसुद्धा तो आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही पोस्ट करत नाही.

दोन मुलांचे पालकत्व

अरिजित आणि कोयल दोघेही आता दोन मुलांचे पालक आहेत. कोयलला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे आणि अरिजितपासून एक मुलगा आहे. अरिजितचे आपल्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम आहे.

लाईव्ह कॉन्सर्टद्वारे कोरोनाग्रस्तांना मदत

कोरोना पीडितांना मदत करण्यासाठी अरिजितने नुकतीच एक व्हर्च्युअल लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केली होती. यातून आलेल्या पैशातून अरिजितने कोरोना ग्रस्त लोकांना मदत केली आहे. या उपक्रमाला ‘हेल्पिंग रूरल इंडिया ब्रीथ अँड स्टे सेफ’ असे म्हणतात.

काही दिवसांपूर्वीच अरिजित सिंगचे मातृछत्र हरपले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर अरिजितच्या आईचे सेरेब्रल स्ट्रोकमुळे निधन झाले होते.

(Love story of famous singer Arijit Singh and his wife Koyal)

हेही वाचा :

Photo : विद्या बालनचा प्रमोशनसाठी अनोखा फंडा, ‘शेरनी’ प्रिंटेड साडीमध्ये दाखवला स्वॅग

Indian Idol 12मध्ये परीक्षक म्हणून हजेरी, आता अभिजित भट्टाचार्यने कार्यक्रमाबद्दल केलं मोठं वक्तव्य!

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.