AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिती सेनॉनने सोशल मीडियावर शेअर केला ‘मिमि’चा लूक, चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता!

कोरोना कालावधीने चित्रपट आणि नाट्यसृष्टीला ग्रहण लागले आहे. याच कारणामुळे थिएटर प्रदर्शनाची प्रतीक्षा सोडून आता मोठे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मची अर्थात ओटीटीची मदत घेत आहेत. नुकतेच अभिनेत्री क्रिती सेनॉनने तिच्या आगामी ‘मिमि’ या चित्रपटाचे मूव्हिंग पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले.

क्रिती सेनॉनने सोशल मीडियावर शेअर केला ‘मिमि’चा लूक, चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता!
क्रिती सेनॉन
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 08, 2021 | 2:39 PM
Share

मुंबई : कोरोना कालावधीने चित्रपट आणि नाट्यसृष्टीला ग्रहण लागले आहे. याच कारणामुळे थिएटर प्रदर्शनाची प्रतीक्षा सोडून आता मोठे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मची अर्थात ओटीटीची मदत घेत आहेत. नुकतेच अभिनेत्री क्रिती सेनॉनने तिच्या आगामी ‘मिमि’ या चित्रपटाचे मूव्हिंग पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. या पोस्टरमध्ये क्रितीचा चित्रपटातील लूक प्रदर्शित केला आहे. याचवेळी या चित्रपटाच्या डिजिटल रिलीजबद्दलही कयास बांधले जात आहेत (Kriti Sanon Share her new look from upcoming movie Mimi).

क्रितीने तिच्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या नव्या अपडेट्सबाबत एक छोटी क्लिप पोस्ट केली आहे. तथापि, ही क्लिप पाहून, ती चाहत्यांना या चित्रपटाचा टीज देत असल्याचा अंदाज लावता येतो. पोस्टर रिलीज होताच क्रितीने या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘या जुलैमध्ये सर्वसामान्यांकडून विलक्षण गोष्टींची अपेक्षा…’

पाहा पोस्टर :

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

मिमी ओटीटीवर रिलीज होणार?

क्रितीच्या या पोस्टवरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, या महिन्यात चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात ती आवश्यक घोषणा करू शकते. अशीही शक्यता वर्तविली जात आहे की, हा चित्रपट आता चित्रपटगृहाऐवजी ओटीटी पर्यायाचा स्वीकार करून या चित्रपटाचे डिजिटल प्रदर्शन होऊ शकते. जूनमध्ये चाहत्यांसमवेत आस्क मी एनीथिंग सेशनदरम्यान कृतीने ‘मिमि’च्या रिलीजसंदर्भातील प्रश्नांवर उत्तर सांगितले होते की,’ लवकरच हा चित्रपट रिलीज करण्याची योजना आहे.’ तेव्हापासून चाहते चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न होता डिजिटल रिलीज होणार आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

नवीन अवतारात दिसणार क्रिती

मिमि चित्रपटाविषयी बोलायचे तर, क्रिती या चित्रपटात सरोगेट आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका मुलाखती दरम्यान, क्रितीने तिच्या भूमिकेबद्दल सांगितले होते की, ‘या चित्रपटात ती एका अशा मुलीच्या भूमिकेत दिसणार असून, तिला अभिनेत्री होण्याचे स्वप्न पडले आहे. ती मांडवा या छोट्याशा गावातली एक प्रसिद्ध नर्तक आहे. दोन जोडप्यांना भेटल्यानंतर क्रिती सरोगेसीचा निर्णय घेते. या निर्णयामुळे त्याचे आयुष्य बदलते. क्रितीने या पात्रासाठी आपले वजनही वाढवले ​​होते. आता ती पुन्हा आपल्या नेहमीच्या आकारात परत आली आहे. या चित्रपटामध्ये कृती एका नवीन अवतारात दिसणार आहे.

(Kriti Sanon Share her new look from upcoming movie Mimi)

हेही वाचा :

Taapsee Pannu | तापसी पन्नूच्या लग्नाबद्दल कुटुंबीय चिंतेत, अभिनेत्री सल्ला देत म्हणाले…

PHOTO | ‘स्ट्राँग माइंड अँड सॉफ्ट हार्ट’, हिना खानचा दिलकश ‘पिंकीश’ अंदाज, पाहा फोटो…

Follow Us
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा