अभिषेक बच्चन याला रस्त्यावर घालावी लागली रात्र, संपूर्ण रात्रभर अभिनेता…

अभिषेक बच्चन याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अभिषेक बच्चनची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत दिसतोय.

अभिषेक बच्चन याला रस्त्यावर घालावी लागली रात्र, संपूर्ण रात्रभर अभिनेता...
अभिषेक -ऐश्वर्या पुन्हा येणार एकत्र ?
Image Credit source: social media
| Updated on: Aug 09, 2024 | 11:36 PM

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित सुरू नसल्याचे सांगितले जातंय. यांच्यातील वाद टोकाला गेला असून लवकरच यांचा घटस्फोट होणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत विदेशात जाताना दिसली. अनंत अंबानी याच्या लग्नामध्ये ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबियांसोबत पोहोचली नाही. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अमिताभ बच्चन यांचा मुलगा असूनही बॉलिवूड करिअरमधील सुरूवातीच्या दिवसांमध्ये मोठा संघर्ष हा अभिषेक बच्चन याला करावा लागला होता. हेच नाही तर चक्क रस्त्यावर झोपण्याची वेळही अभिषेक बच्चन याच्यावर आली. त्याचे झाले असे की, ‘मेजर साहब’ चित्रपटातमध्ये अमिताभ बच्चन आणि अजय देवगण हे मुख्य भूमिकेत होते.

त्यावेळी अभिषेक बच्चनने या चित्रपटासाठी प्रॉडक्शन बॉय म्हणून काम केले. पण त्यावेळी अभिषेक बच्चन याच्याकडून एक मोठी चूक झाली आणि त्याला रात्रभर रस्त्यावर झोपावे लागले. एका शोमध्ये याबद्दलचा खुलासा अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांच्याकडून करण्यात आला. ऑस्ट्रेलियामध्ये मेजर साहब चित्रपटाचे शूटिंग सुरू होते.

ऑस्ट्रेलियामध्ये ज्यावेळी अजय देवगण हा पोहोचला, त्यावेळी त्याची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही अभिषेक बच्चन याची होती, कारण तो प्रॉडक्शन बॉय होता. अजय देवगण याच्यासाठी हॉटेलची रूम बूक करण्याची जबाबदारी ही अभिषेक बच्चन याची होती. पण अभिषेक बच्चन रूम बूक करायला विसरला. अजय देवगण अभिषेकच्या खोलीत थांबला आणि अभिषेकला रात्र रस्त्यावर झोपून काढावी लागली.

रस्त्यावर रात्र घालवण्यापूर्वी अजय देवगणने अभिषेक बच्चनला विचारले होते की, तू दारू पिणार का? अभिषेकने नकार दिला होता. एका चुकीमुळे चक्क अभिषेक बच्चन याला रात्रभर रस्त्यावर झोपावे लागले. अभिषेक बच्चन याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो.