Karthik Aaryan | ‘कांतारा’सारख्या चित्रपटांच्या प्रतिक्षेत कार्तिक आर्यन, म्हणाला की देसी

विशेष म्हणजे कार्तिक याने देखील या चित्रपटासाठी होकार दिल्याचे कळते आहे.

Karthik Aaryan | ‘कांतारा’सारख्या चित्रपटांच्या प्रतिक्षेत कार्तिक आर्यन, म्हणाला की देसी
| Updated on: Dec 13, 2022 | 7:31 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चर्चेतील एक नाव आहे. कार्तिक याच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर आहेत. इतकेच नव्हे तर आतापर्यंत कार्तिक याने अनेक हीट चित्रपट केले आहेत. अत्यंत कमी वेळामध्ये कार्तिकने एक वेगळी ओळख निर्माण केली. कार्तिक आर्यन याला हेराफेरी 3 हा चित्रपट आॅफर झाला. विशेष म्हणजे कार्तिक याने देखील या चित्रपटासाठी होकार दिल्याचे कळते आहे. अक्षय कुमार याने हेराफेरी 3 चित्रपटाला नकार दिला होता. यामुळे चर्चांना उधाण आले. आता हेराफेरी 3 मध्ये अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यन दिसणार आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यन याने आपल्या मनातील मोठी इच्छा बोलून दाखवलीये. कार्तिक म्हणाला की, मी कांतारासारख्या चित्रपटाची वाट पाहात आहे. असे चित्रपट करायला मला प्रचंड आवडेल.

कार्तिक पुढे म्हणाला की, माझे रक्त हे एकदम देसी आहे. मला स्वत: ला देसी चित्रपट बघायला प्रचंड आवडतात. देसी चित्रपटांमध्ये एक वेगळीच मजा असते. यामुळे ‘कांतारा’सारख्या चित्रपटांमध्ये मला काम करायला आवडले.

मला जमिनीशी जोडलेल्या मुद्दावर चित्रपट करण्यास आवडतात. कांतारा चित्रपटासारखे चित्रपट मला बघायला आवडतात, असेही कार्तिक म्हणाला आहे. सध्या कार्तिक आर्यन याच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर आहेत.

हेराफेरी 3 चित्रपटाला नकार का दिला याचे कारण अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. अक्षय म्हणाला की, मला हेराफेरी 3 ची स्क्रीट अजिबात आवडली नाहीये. यामुळेच मी चित्रपटाला नकार दिला आहे.

अक्षय कुमारने स्क्रीट चांगली नसल्याचे सांगितल्यामुळे चित्रपटाचे निर्माते त्याच्यावर नाराज देखील आहेत. कारण चित्रपटाची स्क्रीट चांगली नसल्याचे म्हटल्यामुळे याचा परिणाम थेट चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर होऊ शकतो, हे निर्मात्यांना वाटते.