RIP Yusuf Husain | अभिनेता युसूफ हुसैन यांचे निधन, हंसल मेहता यांनी शेअर केली भावनिक पोस्ट!

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन (Yusuf Husain) यांचे आज (30 ऑक्टोबर) निधन झाले आहे. चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून, तसेच एक भावनिक संदेश लिहून ही माहिती दिली आहे. युसूफ खानने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

RIP Yusuf Husain | अभिनेता युसूफ हुसैन यांचे निधन, हंसल मेहता यांनी शेअर केली भावनिक पोस्ट!
Yusuf Husain
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 11:24 AM

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन (Yusuf Husain) यांचे आज (30 ऑक्टोबर) निधन झाले आहे. चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून, तसेच एक भावनिक संदेश लिहून ही माहिती दिली आहे. युसूफ खानने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

अभिनेते युसूफ हुसैन यांची मुलगी सफीना हिचे लग्न हंसल मेहतासोबत झाले आहे. सासऱ्यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे. युसूफ हुसेनचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘मी शाहिदचे दोन शेड्यूल पूर्ण केले होते आणि आम्ही अडकलो होतो. मी अडचणीत होतो. माझी फिल्ममेकर म्हणून कारकीर्द संपणार होती. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितले की माझ्याकडे फिक्स डिपॉझिट आहे आणि जर तुम्हाला त्रासात असाल, तर त्याचा मला काही उपयोग नाही. त्यांनी मला एक चेक दिला आणि ‘शाहीद’ पूर्ण झाला. ती व्यक्ती युसूफ हुसैन होते.’

पाहा पोस्ट :

आज मी अनाथ झालो!

हंसल मेहता यांनी पुढे लिहिले की, ‘ते माझे सासरे नव्हते तर वडील होते. ते स्वत: एक जीवन होते. आयुष्य मनुष्य असते तर कदाचित त्यांच्या रूपात असते. आज ते गेले. आत ते स्वर्गातील सर्व मुलींना जगातील सर्वात सुंदर मुलगी आणि प्रत्येक पुरुषाला सर्वात सुंदर तरुण म्हणू शकतील आणि शेवटी म्हणेन की, मी तुमच्यावर प्रेम करतो,  तुमच्यावर खूप प्रेम करतो. युसूफ सर या नवीन आयुष्यासाठी मी तुमचा ऋणी आहे. मी आज अनाथ झालो आहे. जीवन पूर्वीसारखे राहणार नाही. मला तुमची खूप आठवण येईल. माझी उर्दू नेहमीच तुटकी असेल आणि हो – मी तुमच्यावर प्रेम करतो,  तुमच्यावर खूप प्रेम करतो.’

युसूफ हुसैन यांनी ‘विवाह’, ‘धूम 2’, ‘खोया खोया चांद’, ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ आणि ‘रोड टू संगम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ते अनेक टीव्ही मालिकांमध्ये वडिलांच्या भूमिकेत दिसले आहेत.

2012 मध्ये, युसूफ यांनी ETimes शी केलेल्या संभाषणात सांगितले होते की, ते अजूनही एका सोबतीच्या शोधात आहे. ते म्हणाले होते की, होय, मी तीनदा लग्न केले आहे, पण मी अजूनही चांगल्या समजूतदार जोडीदाराच्या शोधात आहे पण माझे वय 60 पेक्षा जास्त आहे, पण कदाचित हा शोध कधीच संपणार नाही.

हेही वाचा :

Vinod Mehra Death Anniversary | ‘साजन की सहेली’ पासून ते ‘लाल पत्थर’ पर्यंत, ‘हे’ आहेत विनोद मेहराचे सर्वोत्कृष्ट चित्रपट

Happy Birthday  Abhijeet Bhattacharya | शाहरुख खानचा रोमँटिक आवाज बनून मिळवली प्रसिद्धी, ऐका अभिजित भट्टाचार्यची गाजलेली गाणी!