Vinod Mehra Death Anniversary | ‘साजन की सहेली’ पासून ते ‘लाल पत्थर’ पर्यंत, ‘हे’ आहेत विनोद मेहराचे सर्वोत्कृष्ट चित्रपट

विनोद मेहरा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत, त्यांनी आपल्या 2 दशकांच्या कारकिर्दीत सुमारे 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज अभिनेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल सांगणार आहोत...

1/5
1972 मध्ये आलेल्या ‘अनुराग’ या ड्रामा फिल्ममधील विनोद मेहरा यांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शक्ती सामंता यांनी केले होते, ज्यात विनोद सोबत मौसमी चॅटर्जी मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातून विनोदला वेगळी ओळख मिळाली आणि त्यांनी अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.

2/5
1982मध्ये हृषिकेश मुखर्जी यांनी ‘बेमिसाल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. विनोद मेहरा यांनी या चित्रपटात डॉ प्रशांत चतुर्वेदी यांची भूमिका साकारली होती. विनोदशिवाय अमिताभ बच्चन, राखी, देवेन वर्मा, अरुणा इराणी यांसारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत होते. तरीही विनोदने आपल्या व्यक्तिरेखेने सर्वांची मने जिंकली.

3/5
विनोद मेहरा यांचा ‘स्वर्ग नर्क’ हा एक कौटुंबिक नाटक चित्रपट होता. विनोद मेहरा यांनी त्यात विनोद नावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील विनोदच्या व्यक्तिरेखेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

4/5
‘साजन की सहेली’ हा एक यशस्वी चित्रपट होता, ज्यात विनोद मेहरा, नूतन, राजेंद्र कुमार आणि रेखा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विनोद आणि रेखाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

5/5
‘लाल पत्थर’ चित्रपटातील ‘गीत गाता हूं’ हे गाणे खूप गाजले. हे गाणे विनोद मेहरा यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली, इतकेच नाही तर आजही हे गाणे ऐकल्यानंतर सगळ्यांना त्यांची आठवण येते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI