मुलांनी बाबामधला ‘ब’ जरी उच्चारला, तरी… Father’s Day निमित्त जेनेलियाची रितेशसाठी खास पोस्ट

पालकत्वासारख्या जादूई गोष्टीत माझा जोडीदार झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार. हॅपी बाबाज् डे" अशा शब्दात अभिनेत्री जेनेलिया देशमुखने पती आणि अभिनेता रितेश देशमुखचं कौतुक केलं आहे.

मुलांनी बाबामधला ब जरी उच्चारला, तरी... Fathers Day निमित्त जेनेलियाची रितेशसाठी खास पोस्ट
Riteish and Genelia Deshmukh
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 1:14 PM

मुंबई : अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने फादर्स डे निमित्त (Father’s Day) पती आणि अभिनेता रितेश देशमुखसाठी (Riteish Deshmukh) खास इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. रियान (Riaan) आणि राहिलचे (Rahyl) बाबा असं संबोधत जेनेलियाने रितेशचे जगातील सर्वोत्तम वडील झाल्याबद्दल आभार मानले आहेत. यासोबतच जेनेलियाने तिच्या वडिलांचाही व्हिडीओ शेअर केला आहे. (Actress Genelia Deshmukh shares an Emotional Instagram Post on Father’s Day for husband Actor Riteish Deshmukh)

काय लिहिलंय जेनेलियाने?

रितेश आणि रियान-राहिल यांच्या एका खास फोटोशूटचा व्हिडीओ जेनेलियाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “जगातील सर्वोत्तम वडील झाल्याबद्दल आभार. माझ्यासोबत पुरेसा वेळ न घालवल्याबद्दल मी तुझ्याकडून हव्या त्या गोष्टी उकळू शकते. मात्र मुलांनी बाबामधला ब जरी उच्चारला, तरी त्यांना माहित असतं, की आता तुझं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे वेधलं जाणार.” असं लिहित जेनेलियाने पोस्टला सुरुवात केली आहे.

“मी मुलांसोबत तुझ्याइतकीच निस्वार्थी, संयमी आणि अमेझिंग होऊ शकले असते, तर किती बरं झालं असतं. पण तुला पराभूत करण्याची एकही संधी तू मला देत नाहीस. तू सर्वोत्कृष्ट वडील आहेस आणि हे तुला समजलंच पाहिजे. पालकत्वासारख्या जादूई गोष्टीत माझा जोडीदार झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार. हॅपी बाबाज् डे” अशा शब्दात जेनेलियाने रितेशचं कौतुक केलं आहे.

पाहा जेनेलियाची इन्स्टाग्राम पोस्ट :

याआधी, जेनेलियाने तिच्या वडिलांचा व्हिडीओ शेअर करत त्यांनाही शुभेच्छा दिल्या होत्या. “संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट बाबा होण्यासाठी धन्यवाद पॉप्स. प्रत्येक वेळी जेव्हा मला वाटतं, की मी कुठेतरी कमी पडते, तेव्हा मी फक्त तुमच्याकडे पाहते आणि मी मला माझा सर्वात मोठा प्रशंसक कौतुकाने स्मितहास्य करताना दिसतो. तुम्ही मला उडण्यासाठी पंख दिलेत, लव्ह यू” अशा शब्दात जेनेलियाने भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

जेनेलियाच नाही, विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड, धाकट्या सूनबाई अभिनेत्याची बहीण

बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील, विलासरावांच्या जयंतीला जेनेलियाची भावूक पोस्ट

(Actress Genelia Deshmukh shares an Emotional Instagram Post on Father’s Day for husband Actor Riteish Deshmukh)