AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील, विलासरावांच्या जयंतीला जेनेलियाची भावूक पोस्ट

वडिलांच्या जागी असलेले सासरे विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जेनेलियाने दरवर्षीप्रमाणेच खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. (Genelia Deshmukh Vilasrao Deshmukh)

बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील, विलासरावांच्या जयंतीला जेनेलियाची भावूक पोस्ट
Genelia Deshmukh Vilasrao Deshmukh
| Updated on: May 26, 2021 | 10:29 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज (26 मे) 76 वी जयंती. सासऱ्यांच्या जयंतीनिमित्त अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने खास फोटो शेअर केला आहे. बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील, अशा आशयाचं कॅप्शन जेनेलियाने दिलं आहे. जेनेलियाच्या फोटोवर अनेक जणांनी विलासरावांच्या आठवणी जागवल्या आहेत. (Actress Genelia Deshmukh Riteish Deshmukh shares Emotional Post on Birth anniversary of Father in law Vilasrao Deshmukh)

अभिनेत्री जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. मदर्स डेला आईसोबतच सासूबाईंविषयी प्रेम व्यक्त करणारी पोस्ट असो, किंवा नवरोबा- अभिनेता रितेश देशमुखसोबत (Riteish Deshmukh) खट्याळ-मिश्किल डान्स व्हिडीओ. जेनेलियाच्या इन्स्टाग्राम-ट्विटर पोस्टची नेहमीच चर्चा असते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वडिलांच्या जागी असलेले सासरे विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जेनेलियाने दरवर्षीप्रमाणेच खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

जेनेलियाची पोस्ट काय आहे?

“वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, आम्ही तुमची आठवण काढतो. बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील” असं कॅप्शन देत जेनेलियांना विलासरावांना मारलेल्या मिठीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो रितेश-जेनेलियाच्या लग्नातील असावा. रितेशनेही हा फोटो रिट्वीट केला आहे.

पाहा पोस्ट :

रितेश देशमुखकडूनही आठवणींना उजाळा

दुसरीकडे, रितेश देशमुखही नेहमीच आपल्या वडिलांच्या आठवणीना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देत असतो. रितेशनेही लहानपणीचा फोटो शेअर करत “देवा, घड्याळाचे काटे कृपया पुन्हा उलटे फिरव. तुमची दररोज आठवण येते पप्पा” असं कॅप्शन दिलं आहे.

रितेशचा भावनिक व्हिडीओ :

गेल्या वर्षी, विलासराव देशमुख यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त रितेशने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला होता. “अभी मुझमे कही बाकी है थोडीसी जिंदगी” या गाण्याच्या पार्श्वभूमीवर रितेशने एक व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओच्या अखेरीस विलासरावांची तस्वीरही दिसत होती. तर रितेश आणि विलासरावांचा एक पाठमोरा फोटोही यामध्ये होता. रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना तुमची नेहमी आठवण येते, असं लिहिलं होतं.

संबंधित बातम्या :

जेनेलियाच नाही, विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड, धाकट्या सूनबाई अभिनेत्याची बहीण

लातुरात विलासरावांच्या पुतळ्याशेजारी गोपीनाथरावांचा पूर्णाकृती पुतळा, दोन मित्रांची साथसंगत कायम!

(Actress Genelia Deshmukh Riteish Deshmukh shares Emotional Post on Birth anniversary of Father in law Vilasrao Deshmukh)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.