लातुरात विलासरावांच्या पुतळ्याशेजारी गोपीनाथरावांचा पूर्णाकृती पुतळा, दोन मित्रांची साथसंगत कायम!

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा दोस्ताना संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. (Gopinath Munde Statue near Vilasrao Deshmukh statue In latur)

लातुरात विलासरावांच्या पुतळ्याशेजारी गोपीनाथरावांचा पूर्णाकृती पुतळा, दोन मित्रांची साथसंगत कायम!
विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 11:04 AM

लातूर : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा दोस्ताना संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. जिवंतपणी दोघांनीही आपल्या मैत्रीत कधीच अंतर पडू दिलं नाही. मात्र मृत्यूनंतरही त्यांच्यात अंतर पडत नाही किंबहुना पडणार नाही कारण लातूर जिल्हा परिषदेच्या (Latur ZP) प्रांगणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. (Gopinath Munde Statue near Vilasrao Deshmukh statue In latur)

लातूर जिल्हा परिषदेने दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतीभवन आणि संग्रहालयास जागा उपलब्ध करून देण्याचा एकमुखी ठराव घेतला आहे. त्याच बरोबर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारात उभा करण्यासाठी 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे.

स्मृतीभवनासाठी जागा हस्तांतर

जिल्हा परिषदेची काल (मंगळावर) सर्वसाधारण सभा झाली. त्यात एकमुखाने हा निणर्य घेण्यात आला आहे. लातूर पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानाची जागा विलासराव देशमुख यांच्या स्मृतीभवन आणि संग्रहालयासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने मागितली आहे. त्यास जिल्हा परिषदेने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठरवा घेतला.

प्रादेशिक शासकिय कार्यालय होणार

लातूर पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानात विलासराव देशमुख यांचे स्मृतीभवन उभारण्याबरोबर तिथे दक्षिण मराठवाड्याचे दर्शन घडवणारे प्रादेशिक शासकिय कार्यालय निर्माण करण्यात येणार आहे.

विलासराव देशमुख लातूरचे, तर गोपीनाथ मुंडे बीडचे. त्याकाळी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना ‘दो हंसो का जोडा’ असे संबोधले जात असे. मैत्रीला अनुसरुन या राजकीय मित्रांचे स्मारक शेजारी शेजारी उभारण्यात येणार आहेत.

गोपीनाथराव-विलासराव मैत्रीची दुनियात चर्चा

वेगवेगळ्या पक्षात असूनही एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे सख्खे मित्र म्हणून ते परिचित होते.  ग्रामपंचायतीपासून या दोघांच्या राजकारणाला सुरुवात झाली तरी विद्यार्थीदशेपासून ते एकत्र होते. महाविद्यालयीन जीवनात देशमुख-मुंडे जोडीचे किस्से राजकारणात अजूनही ऐकवले जातात. दोघांचे अकाली निधन समर्थकांना चुटपूट लावणारे आहे.

विलासराव देशमुख यांचा प्रदीर्घ प्रवास

सरपंच, आमदार, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास विलासराव देशमुख यांनी केला आहे. अमोघ वक्तृत्व, हजरजबाबीपणा, अजातशत्रू नेतृत्व, प्रशासन हाताळण्याचे कौशल्य, महाराष्ट्राच्या राजकारणाची-समाजकारणाची नाडी अचूक ओळखण्याची क्षमता अशा त्यांच्या गुणांचा गौरव आजही केला जातो. त्यांचा राजकीय वारसा पुत्र आणि मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख चालवतात. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचे निधन झाले.

गोपीनाथ मुंडेंचं संघर्षमय जीवन

युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले. मनमिळाऊ स्वभावाचे, सर्वसामान्यांच्या गरजांची जाण असलेले ‘लोकनेते’ अशी त्यांची कीर्ती होती. 3 जून 2014 रोजी दिल्लीत गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यांचा राजकीय वारसा कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे चालवतात.

(Gopinath Munde Statue near Vilasrao Deshmukh statue In latur)

हे ही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.