VilasraoDeshmukh75 | विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशचा भावनिक व्हिडिओ

रितेश नेहमीच आपल्या वडिलांच्या आठवणीना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देत असतो. यावेळी रितेशने शेअर केलेला फोटो अनेकांचे डोळे पाणावणारा आहे (Riteish Deshmukh Emotional Video on Vilasrao Deshmukh 75th Birth Anniversary)

VilasraoDeshmukh75 | विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशचा भावनिक व्हिडिओ

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज (26 मे) 75 वी जयंती. वडिलांच्या जयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुख याने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. विलासरावांच्या पोषाखाला बिलगून रितेश त्यांचं अस्तित्व जाणवून घेताना दिसत आहे. (Riteish Deshmukh Emotional Video on Vilasrao Deshmukh 75th Birth Anniversary)

“अभी मुझमे कही बाकी है थोडीसी जिंदगी” या गाण्याच्या पार्श्वभूमीवर रितेशने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या अखेरीस विलासरावांची तस्वीरही दिसते. तर रितेश आणि विलासरावांचा एक पाठमोरा फोटोही यामध्ये आहे. रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना तुमची नेहमी आठवण येते, असं लिहिलं आहे.

रितेश नेहमीच आपल्या वडिलांच्या आठवणीना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देत असतो. यावेळी रितेशने शेअर केलेला फोटो अनेकांचे डोळे पाणावणारा आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास असलेल्या विलासराव देशमुख यांना राज्यभरातील समर्थकांनी आदरांजली अर्पण केली आहे.

याशिवाय, विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांनीही ट्विटरवरुन वडिलांना आदरांजली वाहिली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विलासरावांना पंचाहत्तराव्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आहे.

(Riteish Deshmukh Emotional Video on Vilasrao Deshmukh 75th Birth Anniversary)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI