Malaika Arora | मलायका अरोराची मित्रपरिवारासोबत धमाल पार्टी, बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत खास फोटो…

Malaika Arora | मलायका अरोराची मित्रपरिवारासोबत धमाल पार्टी, बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत खास फोटो...
मलायका अरोरा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच आपल्या स्टाईल आणि अनोख्या अंदाजाने लोकांची मने जिंकताना दिसते. ती नेहमीच फिटनेसला अधिक महत्त्व देताना दिसते, त्याचबरोबर बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते.

Harshada Bhirvandekar

|

Mar 25, 2021 | 11:41 AM

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच आपल्या स्टाईल आणि अनोख्या अंदाजाने लोकांची मने जिंकताना दिसते. ती नेहमीच फिटनेसला अधिक महत्त्व देताना दिसते, त्याचबरोबर बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते. याशिवाय मलायका अरोराची काही फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत, ज्यात ती करण जोहर, बॉयफ्रेंड अर्जुन कपूर (arjun kapoor), मैत्रीण करिश्मा कपूर (Karisma Kappor) आणि बाकी बॉलिवूड स्टार्ससोबत पार्टी करताना दिसत आहे. फोटोमध्ये मलायकाने लाल रंगाचे कपडे परिधान केले होते. ज्यामध्ये तिचा स्टायलिश अंदाज खरोखर अप्रतिम दिसत होता (Actress Malaika Arora partying with boyfriend arjun kapoor and karan johar).

पाहा मलायकाचा खास अंदाज

अभिनेता अर्जुन कपूर आणि करण जोहरसोबत ता चर्चित फोटोमध्ये मलायका अरोरा दिसत आहे. तर, दुसर्‍या फोटोमध्ये ती करिश्मा कपूर, अमृता अरोरा, करण जोहर आणि इतर कलाकारांसमवेत दिसली आहेत. यात मलायका फोटोसाठी खास पोज करताना दिसत आहेत. हे फोटो करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. आता सोशल मीडियावरही हे फोटो खूप चर्चेत आहेत. याशिवाय मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर देखील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पार्टीच्या वेळीच अर्जुन कपूर आणि करण जोहरसोबत पोज देताना दिसत आहे (Actress Malaika Arora partying with boyfriend arjun kapoor and karan johar).

फिटनेस फ्रिक मलायका

मलायका अरोराच्या या सर्व फोटोंमध्ये तिची स्टाईल खरोखर सुंदर दिसते आहे. मलायकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, तिला शेवट सोनी टीव्हीवर ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये जजच्या भूमिकेत पाहिले गेले होते. गीता कपूर आणि टेरेंस लुईस यांच्यासमवेत तिने या कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा सांभाळली होती. याशिवाय मलायका अरोरा तिच्या योगा व्हिडीओ आणि फोटोंसाठीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आपल्या फिटनेसबाबत नेहमी सतर्क असणारी मलायका अरोरा बर्‍याचदा योगाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

मलायकाचा डान्स एक्सरसाईड व्हिडीओ

मलायका आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. म्हणूनच ती आजही अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. मलायका अगदी नियमितपणे योग आणि अन्य एक्सरसाईज करते. वर्कआऊट करताना ती आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्म्सवर टाकत असते. यापूर्वीही मलायकाने एक एस्करसाईजचा एक खास व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसून येत होती.

(Actress Malaika Arora partying with boyfriend arjun kapoor and karan johar)

हेही वाचा :

Birth Anniversary  | पहिल्या चित्रपटासाठी मिळालेले केवळ 750 रुपये, अभिनयाच्या जोरावर पटकावला ‘राष्ट्रीय पुरस्कार’, वाचा फारुख शेख यांच्याबद्दल…

अभिनेत्याचा रिक्षात मृतदेह, चित्रपटसृष्टीत सलग दोन दशकं संघर्ष करणाऱ्या दिग्गजाची काळीज चिरणारी एक्झिट !

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें