AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birth Anniversary  | पहिल्या चित्रपटासाठी मिळालेले केवळ 750 रुपये, अभिनयाच्या जोरावर पटकावला ‘राष्ट्रीय पुरस्कार’, वाचा फारुख शेख यांच्याबद्दल…

फारुख यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी वकील व्हावे, परंतु अभिनय क्षेत्रात येणे हे त्यांचे स्वतःचे स्वप्न होते. चला तर, जाणून घेऊया फारुख यांच्याबद्दल काही खास गोष्टी...

Birth Anniversary  | पहिल्या चित्रपटासाठी मिळालेले केवळ 750 रुपये, अभिनयाच्या जोरावर पटकावला ‘राष्ट्रीय पुरस्कार’, वाचा फारुख शेख यांच्याबद्दल...
फारुख शेख
| Updated on: Mar 25, 2021 | 10:40 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा सदाबहार अभिनेते फारुख शेख (Farooq Shaikh) यांचा आज वाढदिवस आहे. फारुख यांचा जन्म 25 मार्च 1948 रोजी झाला होता. आज फारुख यांचा 73वा वाढदिवस आहे. 1977पासून ते 1989पर्यंत या अभिनेत्याने पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. फारुख यांनी आपल्या अनोख्या अभिनय शैलीमुळे चाहत्यांना नेहमी वेड लावले. मोठ्या पडद्यानंतर अभिनेत्याने छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली. फारुखच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी वकील व्हावे, परंतु अभिनय क्षेत्रात येणे हे त्यांचे स्वतःचे स्वप्न होते. चला तर, जाणून घेऊया फारुख यांच्याबद्दल काही खास गोष्टी…(Bollywood Actor Farooq Shaikh Birth Anniversary  special)

पहिल्या चित्रपटातून ‘इतकी’ कमाई

कॉलेजच्या काळापासून फारुख शेख थिएटरमध्ये दाखल झाले होते. थिएटरमधील त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीमुळे त्यांना 1973मध्ये रिलीज झालेल्या ‘गर्म हवा’ चित्रपटात ब्रेक मिळाला. फारुख यांना या चित्रपटासाठी केवळ 750 रुपये इतकेच मानधन मिळाले होते. बराच काळ फारुख चांगल्या कामासाठी संघर्ष करत राहिले.

नशीब बदलेले!

निर्माता-दिग्दर्शक यश चोप्राच्या 1979मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नूरी’ या चित्रपटाने फारूख शेख यांचे भविष्य बदलले. या चित्रपटाने फारुखला एक नवी ओळख मिळवून दिली. यानंतर 1981मध्ये रिलीज झालेल्या ‘उमराव जान’ या चित्रपटाने त्यांची कारकीर्द बदलली. आजपर्यंत चित्रपटात फारुख यांनी साकारलेल्या भूमिकेला चाहते अजूनही विसरलेले नाहीत.

फारुख यांनी चित्रपटात तसेच व्यावसायिक चित्रपटातही एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘शतरंज के खिलाडी’, ‘उमराव जान’, ‘कथा’, ‘बाजार’, ‘चश्म-ए-बद्दूर’, ‘क्लब 60’ आणि इतर बऱ्याचशा चित्रपटातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. फारुख शेख यांनी सत्यजित रे, ऋषिकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले (Bollywood Actor Farooq Shaikh Birth Anniversary  special).

दीप्ती नवलसह जमली जोडी

फारुख शेखसोबत दीप्ती नवलची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या जोडीचा जवळपास प्रत्येक चित्रपट पडद्यावर यशस्वी झाला. फारुख शेख यांनी दीप्ती नवलबरोबर ‘चश्म-ए-बद्दूर’, ‘कथा’, ‘साथ-साथ’, ‘किसी से ना कहना’, ‘रंग बिरंगी’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

वर्षानुवर्षे अभिनय केल्यावर, 2010मध्ये ‘लाहोर’ मधील अभिनयासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता’ म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2014 मध्ये रिलीज झालेला ‘यंगिस्तान’ हा फारुख शेख यांचा अखेरचा चित्रपट होता. 28 डिसेंबर 2013 रोजी, फारुख शेख यांनी हृदयविकाराच्या झटक्यामुळे या जगाचा  निरोप घेतला.

(Bollywood Actor Farooq Shaikh Birth Anniversary  special)

हेही वाचा :

अबब ! शनाया कपूरने एवढ्या महाग बिकिनीवर केले फोटोशूट, किंमत तब्बल….

Malaika Arora : मलायचा अरोराकडून शिका प्लँक्सची मजेशिर पद्धत, व्हिडीओ व्हायरल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.