
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनय आणि तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. तिच्या 'फुलवंती' चित्रपटातील अभिनयाचे देखील मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.

सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अशातच तिने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ती लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती 'रानबाजार' या वेबसीरिजनंतर आणखी एका नव्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यामुळे आता चाहत्यांना त्या वेबसीरिजबाबत आणखी उत्सुकता लागली आहे.

प्राजक्ता माळी ही लवकरच Zee 5च्या 'देवखेळ' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजच्या प्रमोशनचे काही खास व्हिडीओ तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

यामध्ये तिने म्हटलं की, 'देवखेळ'चं प्रमोशन सुरु. लवकरच प्रीमिअर येणार भेटीला असं म्हटलं आहे.

यासह तिने अंकुश चौधरीसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यामुळे आता चाहत्यांना देखील प्रचंड उत्सुकता लागली आहे.