VIDEO : काय सांगता… सारा अली खानने चक्क हेअर स्टायलिशसोबत केला रोमान्स, पाहा व्हिडीओ!

या व्हिडिओमध्ये साराने दोन गाण्यावर जबरदस्त डान्स केलायं. पहिल्यांदा साराने स्टुडिओमध्ये तिच्या हेअरस्टायलिस्टसोबत 'बाहों में चले आओ' गाण्यावर खूप अप्रतिम डान्स केलायं तर दुसऱ्या गाण्यावर पल पल न माने टिंकू जिया या गाण्यावर खतरनाक डान्स केलायं.

VIDEO : काय सांगता... सारा अली खानने चक्क हेअर स्टायलिशसोबत केला रोमान्स, पाहा व्हिडीओ!
| Edited By: | Updated on: Sep 08, 2022 | 12:00 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळामध्ये सारा अली खानने (Sara Ali Khan) स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. सारा नेहमीच चर्चेच असते. गेल्या काही वर्षांमध्ये साराच्या फॅन फाॅलोइंगमध्येही वाढ झालीयं. सोशल मीडियावर सारा सक्रिय असून चाहत्यांसाठी विविध प्रकारचे फोटो (Photo) सारा शेअर करते. नुकतेच साराने तिचा एक नवीन मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलायं. या व्हिडीओमध्ये सारा जया बच्चन यांच्या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. विशेष म्हणजे चाहत्यांना देखील साराचा हा खास व्हिडीओ (Video) आवडलायं.

पाहा सारा अली खानचा व्हिडीओ

‘बाहों में चले आओ’ गाण्यावर सारा अलीचा रोमान्स

या व्हिडिओमध्ये साराने दोन गाण्यावर जबरदस्त डान्स केलायं. पहिल्यांदा साराने स्टुडिओमध्ये तिच्या हेअरस्टायलिस्टसोबत ‘बाहों में चले आओ’ गाण्यावर डान्स करत रोमान्स केलायं तर दुसऱ्या गाण्यावर पल पल न माने टिंकू जिया या गाण्यावर खतरनाक डान्स केलायं. विशेष म्हणजे टिंकू जियावरील साराचा डान्स बघितल्यावर कोणीही स्वत: हसण्याशिवाय रोखू शकत नाहीयं. आता साराचा हा खास डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं.

पल पल न माने टिंकू जिया या गाण्यावर साराचा जबरदस्त डान्स

हा व्हिडीओ शेअर करताना सारा अली खानने लिहिले की, अपीयरेंस vs अॅपिरियन्स  अॅक्यूरेट व्हर्जन…या व्हिडिओवर यूजर्स अनेक प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ही मुलगी वेडी झालीयं. सारा अली खान अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’मध्ये दिसली होती. लोकांना साराचा हा चित्रपटही आवडला होता. अनेकांनी साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्या पेजवर शेअर केलायं.