AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK AFG War : पाक विरुद्ध युद्ध , अफगाणिस्तानच्या माजी महिला खासदाराला भारतावर प्रचंड विश्वास, म्हणाल्या भारतचं यांची…

PAK AFG War : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धा दरम्यान अजून भारताची भूमिका समोर आलेली नाही. पण सर्वसामान्य अफगाणि नागरिकाप्रमाणे तिथल्या माजी महिला खासदाराला भारताबद्दल प्रचंड विश्वास आहे. तिने एक मोठी मागणी केली आहे.

PAK AFG War : पाक विरुद्ध युद्ध , अफगाणिस्तानच्या माजी महिला खासदाराला भारतावर प्रचंड विश्वास, म्हणाल्या भारतचं यांची...
Ex Afghanistan MP Mariam SolaimankhilImage Credit source: AP/PTI/ANI
| Updated on: Feb 28, 2026 | 11:43 AM
Share

अफगाणिस्तान-पाकिस्तान युद्ध सुरु असताना अफगाणिस्तानच्या माजी खासदार मरियम सोलेमानखिल यांनी भारताकडे मोठी मागणी केली आहे. त्यांनी भारताबद्दल प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला आहे. मरियम सोलेमानखिल या सध्या विजनवासात आहेत. म्हणजे त्यांचं वास्तव्य अफगाणिस्तानात नाहीय. “पाकिस्तानचा अनेक दशकांपासून दहशतवादाला असलेला पाठिंबा तसच त्यांच्या धोकादाय अणवस्त्रांबाबत भारताने आता निर्णायक भूमिका घ्यावी” अशी सोलेमानखिल यांनी मागणी केली आहे. “आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या कारवाया उघड करुन त्यांच्यावर जागतिक निर्बंध आणण्यास भारत सक्षम आहे” असा विश्वास मरियम सोलेमानखिल यांनी व्यक्त केला.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सोलेमानखिल यांनी आपल्या या भावना व्यक्त केल्या. सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जोरदार लढाई सुरु आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तावर रविवारी एअर स्ट्राइक केला. त्यानंतर गुरुवारी रात्री अफगाणि फौजांनी डुरंड लाईनवरील पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या. त्यांच्या 55 सैनिकांना मारलं. मग, पाकिस्तानने त्याच रात्री अफगाणिस्तानात एअर स्ट्राइक केला. काल सकाळी अफगाणि एअरफोर्सने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करुन या कारवाईचा बदला घेतला

आणि भारत हे करण्यास सक्षम

पाकिस्तानच्या दहशतवाला पुरस्कृत करण्याच्या धोरणामुळे लाखो लोकांच्या आयुष्यावर जो परिणाम झालाय, त्यासाठी भारत त्यांना जबाबदार ठरवून उत्तर मागू शकतो. हुकूमशाही पद्धतीने तिथे जो कारभार चाललाय त्यावर सुद्धा मरियम सोलेमानखिल यांनी टीका केली. “पाकिस्तानकडे अणवस्त्र असल्याने ते खूप धोकादायक आहेत हे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आणलं पाहिजे. जो देश ओसामा बिन लादेनला आश्रय देतो, अनेक दहशतवादी संघटना बनवतो आणि आम्हीच ही घाणेरडी काम केली, याची कबुली देतो आणि तरी त्यांच्याकडे अणवस्त्र आहेत? त्यांच्यावर निर्बंध आणले पाहिजेत. त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. लगेचच त्यांची अणवस्त्र संपवली पाहिजेत आणि भारत हे करण्यास सक्षम आहे” असा विश्वास मरियम सोलेमानखिल यांनी व्यक्त केला.

भारताची भूमिका काय?

आम्हीच दहशतवादाचे पीडित आहोत या पाकिस्तानी दाव्यावर त्यांनी जोरदार टीका केली. “पाकिस्तानची लष्करी हुकूमशाही आणि रावळपिंडीमध्ये बसलेले जनरल्स हे यु्द्धामधून बिझनेस करतात” असा आरोप सोलेमानखिल यांनी केला. सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये सुद्धा असलेल्या युद्धावर भारताचं बारीक लक्ष आहे. भारताची भूमिका अजून समोर आलेली नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...