Rohman Shawl | सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार, या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला…

सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. रोहमन शॉल मॉडेल म्हणून काम करतो. मात्र, नशिब अचानक चमकल्याने त्याला थेट चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळालीयं.

Rohman Shawl | सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार, या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला...
| Edited By: | Updated on: Sep 07, 2022 | 1:15 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचा एक फोटो शेअर करून आपले नाते जगजाहिर केले. ललित मोदी यांच्या पोस्टनंतर अनेकांनी भुवया उंचावला. काहींनी या नात्यावर टिका केली तर काहींनी समर्थन करत प्रेमाला वयाची मर्यादा नसल्याचे म्हटले होते. हे सर्व प्रकरण शांत होत असतानाच आता सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड (Boyfriend) विषयी महत्वाची बातमी पुढे येत असून लवकरच सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड चित्रपटसृष्टीत (Movie) पदार्पण करणार आहे.

सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार

सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. रोहमन शॉल मॉडेल म्हणून काम करतो. मात्र, नशिब अचानक चमकल्याने त्याला थेट चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळालीयं. मॉडेलिंगमध्ये रोहमनने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण नक्कीच केलीयं. आता आपले नशिब चित्रपटासृष्टीत आजमवण्यासाठी रोहमन तयार आहे. मात्र, रोहमन शॉल नेमक्या कोणत्या चित्रपटात काम करणार हे अघ्याप कळू शकले नाहीयं.

चित्रपटात काश्मिरी मुलाच्या भूमिकेत दिसणार रोहमन शॉल

रोहमन शॉलने बोलताना सांगितले की, मी लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असून मला एक चित्रपट मिळालायं. या चित्रपटात मी काश्मिरी मुलाच्या भूमिकेत असेल. पण मला काश्मिरबद्दल इतके जास्त काही माहिती नाहीयं. माझ्यासाठी हे एक मोठे आवाहन आहे. मी तुम्हाला चित्रपटाबद्दल अधिक काही माहिती देऊ शकत नाही. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आता रोहमन शॉलचे चाहते रोहमनला चित्रपटात बघण्यासाठी आतुर झाले आहेत.