AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brahmastra Promotion: बजरंग दलाने ब्रह्मास्त्र टीमला रोखलं, महाकाल दर्शनासाठी रणबीर- आलिया आले, पण

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मंगळवारी सायंकाळी 7 वाजता महाकाल मंदिरात येणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. दुपारी 4 वाजल्यापासून बजरंग दलाचे कार्यकर्ते व्हीआयपी गेटभोवती जमू लागले.

Brahmastra Promotion: बजरंग दलाने ब्रह्मास्त्र टीमला रोखलं, महाकाल दर्शनासाठी रणबीर- आलिया आले, पण
| Edited By: | Updated on: Sep 07, 2022 | 1:08 PM
Share

मुंबई : ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाच्या रिलीजसाठी अवघे काही तास उरले आहेत. चित्रपटाची संपूर्ण टिम सध्या जोरदार प्रमोशन (Promotion) करताना दिसतेय. आमिर खान, अक्षय कुमार यांचे बहुचर्चित चित्रपट फ्लाॅप झाल्यानंतर आता रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र बाॅक्स आॅफिसवर काय जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे (Bollywood) चित्रपट काही खास कमाल दाखू शकले नाहीयंत. आता ब्रह्मास्त्र चित्रपटासंदर्भात मध्य प्रदेशातून एक अत्यंत मोठी बातमी पुढे येऊ लागलीयं.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रणबीर कपूरचा केला विरोध

मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालच्या दर्शनासाठी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर जाणार होते. मात्र, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या टीमला मंदिरात जाण्यापासून रोखल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. बजरंग दलाच्या विरोधामुळे रणबीर आणि आलिया मंदिरात पोहोचू शकले नाहीत. मात्र, प्रचंड विरोध होत असताना चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि टीमने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सुरक्षेमुळे रणबीर आणि आलियाला अर्ध्या रस्त्यामधूनच परतावे लागले.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मंगळवारी सायंकाळी 7 वाजता महाकाल मंदिरात येणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. दुपारी 4 वाजल्यापासून बजरंग दलाचे कार्यकर्ते व्हीआयपी गेटभोवती जमू लागले. मात्र, याची कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती. प्रोडक्शन टीमची वाहने जशीही गेटजवळ पोहचली तशी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. इतकेच नाही तर काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडेही दाखवले.

रणबीरचा तो व्हिडीओ भोवण्याची शक्यता

या प्रकरणाची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान पोलिस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. चित्रपटाची टीम आणि अयान मुखर्जी मंदिरात गेले आणि दर्शन घेऊन परतले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा रणबीर कपूर आणि आलियाला विरोध होता. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरने एका व्हिडीओमध्ये बीफ खाण्याचे वक्तव्य केले होते, यावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात येण्यास रणबीर आणि आलियाला विरोध केल्याचे कळते.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा