Pushpa 2 | पुन्हा एकदा धमाका… अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चे बजेट 500 कोटी, निर्मात्यांनी सांगितली रिलीजची तारीख

| Updated on: Jul 23, 2022 | 11:39 AM

'पुष्पा पार्ट 2'साठी अॅक्शन सीक्वेन्स आणि स्टंट्स महत्वाचे आखने सुरू आहे. चित्रपट खास बनवण्यासाठी बजेटचा मोठा खर्च होणार आहे. आता निर्मात्यांनी 'पुष्पाच्या बजेटबाबत काही अपडेट शेअर केले आहेत. अल्लू अर्जुनच्या या दमदार सीक्वलचे बजेट 350 कोटी रुपये असणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये समोर आले होते.

Pushpa 2 | पुन्हा एकदा धमाका... अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चे बजेट 500 कोटी, निर्मात्यांनी सांगितली रिलीजची तारीख
Follow us on

मुंबई : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तेलगू चित्रपटसृष्टीतील या शानदार चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक प्रेम पुष्पा चित्रपटाला मिळाले. नुसता चित्रपटच (Movie) नव्हेतर त्यातील गाणीही हिट ठरली. आता ‘पुष्पा द रुल’चा सिक्वेल आणखी दमदार करण्यासाठी निर्माते कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, अभिनेता विजय सेतुपती ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या कलाकारांमध्ये अल्लू अर्जुनसोबत कहाड फाजील आणि रश्मिका मंदान्ना देखील असतील.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले अत्यंत महत्वाची माहिती

‘पुष्पा पार्ट 2’साठी अॅक्शन सीक्वेन्स आणि स्टंट्स महत्वाचे आखने सुरू आहे. चित्रपट खास बनवण्यासाठी बजेटचा मोठा खर्च होणार आहे. आता निर्मात्यांनी ‘पुष्पाच्या बजेटबाबत काही अपडेट शेअर केले आहेत. अल्लू अर्जुनच्या या दमदार सीक्वलचे बजेट 350 कोटी रुपये असणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये समोर आले होते. पण आता या चित्रपटाचे एक निर्माते वाय. शंकर यांनी ‘पुष्पा 2’चे बजेट यापेक्षाही अधिक असणार असे सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपटाच्या यशाने आम्ही नक्कीच आश्चर्यचकित झालो

शंकर यांनी बिझनेस टुडेसोबत संवाद साधला. उत्तर भारतात चित्रपटाचे प्रमोशन करू शकलो नसल्याबद्दल मला अजूनही खंत आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना शंकर म्हणाले की, दक्षिण भारताबाहेर चित्रपटाच्या यशाने आम्ही नक्कीच आश्चर्यचकित झालो, आम्हाला माहित नव्हते की तो इतका मोठा असेल कारण आम्ही प्रमोशनवर जास्त वेळ दिला नाही.’पुष्पा 2’साठी 500 कोटी रुपयांची गरज असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

‘पुष्पा 2’ च्या प्रमोशनवर खर्च होणार 50 कोटी

बिझनेस टुडेच्या मुलाखतीत निर्मात्यांनी असेही संकेत दिले आहेत की ‘पुष्पा 2’ च्या प्रमोशनचे बजेट 5 पटीने वाढू शकते आणि 50 कोटी रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो. यावेळी त्यांना देशाच्या प्रत्येक भागात जवळपास दोन महिने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करायचे आहे. शंकर पुढे बोलताना म्हणाले की, ऑगस्ट 2023 पर्यंत चित्रपट प्रदर्शित करायचा आहे. आधीच्या वृत्तानुसार, हा चित्रपट डिसेंबर 2022 पर्यंत प्रदर्शित होणार होता.