Amitabh Bachchan | हा मोठा आरोप करत अमिताभ बच्चन यांनी कंपनीला पाठवली कायदेशीर नोटीस

| Updated on: Nov 20, 2022 | 5:00 PM

कोरोनानंतर बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट काही खास धमाका करत नसताना बिग बीच्या ऊंचाईने चांगली कमाई केली.

Amitabh Bachchan | हा मोठा आरोप करत अमिताभ बच्चन यांनी कंपनीला पाठवली कायदेशीर नोटीस
Amitabh Bachchan
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : बिग बी कायमच प्रचंड चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनुपम खेर देखील महत्वाच्या भूमिकेत होते. कोरोनानंतर बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट काही खास धमाका करत नसताना बिग बीच्या ऊंचाईने चांगली कमाई केली. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. आता एका वेगळ्या कारणामुळे अमिताभ बच्चन चर्चेत आले आहेत.

ऑक्टोबरमध्ये अमिताभ बच्चन यांनी जाहिर केले होते की, त्यांनी पान मसाला ब्रँडसोबतचा करार संपवला आहे. यानंतर ते पान मसालाच्या जाहिरातीमध्ये दिसणार नाहीत.

बिग बीची पान मसालाची जाहिरात पाहून अनेकांना मोठा धक्का बसला होता. इतकेच नाही तर अनेकांनी अमिताभ बच्चन यांच्यावर टीकाही केली होती. त्यानंतर मोठा निर्णय अमिताभ बच्चन यांनी घेतला.

आता अमिताभ बच्चन यांनी या पान मसाला ब्रँडला एक नोटीस पाठवली आहे. ब्रँडसोबतचा करार संपला असताना देखील त्यांच्या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन यांना दाखवण्यात येत असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

करार संपला असला तरीही अजूनही ब्रँडकडून अमिताभ बच्चन असलेली जाहिरात प्रसारित केली जात असल्याचे सांगितले जात आहे. टीव्हीवरील जाहिरातीचे प्रसारण लगेचच थांबवावे, असे त्या कायदेशीर नोटीसमध्ये म्हणण्यात आले आहे.

कमला पसंदची जाहिरात प्रसारित झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ब्रँडसोबत संपर्क करत त्यामधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर बिग बीने हा करार संपला आणि त्यांचे पैसेही परत दिले होते.

ज्यावेळी अमिताभ बच्चन यांनी ही जाहिरात केली होती, त्यावेळी त्यांना याची मुळीच कल्पना नव्हती की, ही जाहिरात सरोगेट जाहिरातींच्या अंतर्गत येते. या जाहिरातीनंतर बिग बीवर टीकाही करण्यात आली होती.