अमिताभ बच्चन यांनी हृषिकेशमध्ये केली गंगा आरती; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नुकतीच उत्तराखंडच्या ऋषिकेशला (Rishikesh) भेट देऊन तिथे पूजाही केली. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते परमार्थ गंगा आरती (Ganga Aarti) करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत स्वामी चिदानंद सरस्वतीसुद्धा उपस्थित होते.

अमिताभ बच्चन यांनी हृषिकेशमध्ये केली गंगा आरती; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल
Amitabh Bachchan performs ganga aarti
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2022 | 9:54 AM

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नुकतीच उत्तराखंडच्या हृषिकेशला (Rishikesh) भेट देऊन तिथे पूजाही केली. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते परमार्थ गंगा आरती (Ganga Aarti) करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत स्वामी चिदानंद सरस्वतीसुद्धा उपस्थित होते. यावेळी बिग बींनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट असा त्यांचा लूक होता. एका फोटोमध्ये ते पायऱ्यांवर बसून स्वामी चिदानंद सरस्वती बोलत असताना त्यांना ऐकताना दिसले. स्वामी चिदानंद सरस्वती हे परमार्थ निकेतनचे अध्यक्ष आहेत. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये गंगा नदीकिनारी बसल्याचा स्वत:चा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे.

या ब्लॉगमध्ये बिग बींनी गंगा पूजेदरम्यानचा अनुभवसुद्धा सांगितला आहे. त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ या चित्रपटाची शूटिंग उत्तराखंडमध्ये सुरू आहे. यामध्ये त्यांच्यासोबत ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना भूमिका साकारतेय. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात नीना गुप्ता, अभिषेक खान, पावैल गुलाटी, साहील मेहता यांच्याही भूमिका आहेत. बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रश्मिकासोबतचा फोटोसुद्धा शेअर केला होता. ‘पुष्पा’ असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केला होता.

गंगा घाटवर पूजा करतानाचे फोटो-

बिग बींनी केली गंगा आरती-

अमिताभ बच्चन यांचे काही चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये गुडबाय, ब्रह्मास्त्र, रनवे 34 यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामध्ये बिग बींनी फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.

हेही वाचा:

Mumbai: निवेदिता सराफ यांच्यासमोर ड्राइव्हरला बेदम मारहाण

The Kashmir Filesचा मोठा विजय; विवेक अग्निहोत्रींनी ट्विट करत दिली माहिती