अमिताभ बच्चन 84 व्या वर्षी एवढे फिट कसे? कुणीच सांगणार नाही असं सीक्रेट उघड; त्या गोष्टीमुळे…

अमिताभ बच्चन ८४ व्या वर्षीही फिट कसे आहेत, हे जाणून घेणं अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या फिटनेसचे रहस्य नियमित व्यायाम, २६ वर्षांपासून पाळलेली सातत्यपूर्ण दिनचर्या, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यात दडले आहे. ते जास्त हेवी वर्कआउट्सऐवजी ताकद, गतिशीलता आणि एकूण आरोग्यावर लक्ष केंद्रित करतात.

अमिताभ बच्चन 84 व्या वर्षी एवढे फिट कसे? कुणीच सांगणार नाही असं सीक्रेट उघड; त्या गोष्टीमुळे...
Amitabh Bachchan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 9:51 PM

भारतीय सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आज वयाचे 84 वर्ष पूर्ण केले आहेत. या वयातही अमिताभ बच्चन फिट अँड फाईन आहेत. अजूनही त्यांनी निवृत्ती घेतली नाही. अजूनही कोणत्याही शिफ्टमध्ये काम करतात. अजूनही रात्री अपरात्रीपर्यंत काम करणं सुरू ठेवतात. अजूनही स्वत: गाडी चालवतात. अजूनही स्वत:ची जास्तीत जास्त कामे स्वत: करतात आणि अजूनही चेहऱ्यावर तेच हास्य ठेवून असतात. सोशल मीडियावरही तेवढेच सक्रिय असतात. त्यामुळे अमिताभ थकत का नाहीत? त्यांच्या फिटनेस मागचं नेमकं रहस्य काय आहे? असा सवाल केला जातो. अखेर अमिताभ यांचं हे सीक्रेट उघड झालंच आहे.

‘कौन बनेगा करोड़पती’चं सूत्रसंचालन करण्यापासून ते रेग्युलर एक्सरसाईज रुटीन ठेवण्यापर्यंत, अमिताभ यांनी वय वाढलं तरी सक्रिय राहिलं पाहिजे हे दाखवून दिलं आहे. तसेच सक्रिय राहणं किती महत्त्वाचं आहे, याचं महत्त्वही पटवून दिलं आहे. वय वाढल्याने मांसपेशीतील ताकद, गुडघ्यांची गतिशीलता आणि संतुलन यात बदल होतो. पण फिटनेस असेल तर यावर मात करता येते हे अमिताभ बच्चन यांनी दाखवून दिलं आहे. फिटनेस ठेवल्याने तुम्ही कसे सक्रिय राहू शकता हेही त्यांनी दाखवून दिलं आहे.

Loading...

फिट राहण्यासाठी काय करतात?

अमिताभ बच्चन यांच्या ट्रेनरच्या मते, अमिताभ बच्चन दोन दशकाहून अधिक काळापासून नियमित व्यायाम करतात. रात्री 2 वाजता घरी आले तरी आधी व्यायाम करून मगच ते झोपतात. व्यायाम करण्याचा नियम कधीच चुकवत नाहीत. तसेच त्यांनी वाढत्या वयानुसार शारीरिक गरजाही बदलल्या आहेत. सातत्य हा त्यांच्या फिटनेसचा मंत्र आहे. अत्याधिक वर्कआऊट करण्यापेक्षा ताकद, गतिशिलता आणि एकूण आरोग्यावर त्यांचा भर असतो.

इंडियन एक्सप्रेसला सिलिब्रेटी फिटनेस कोच शिवोहम भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन सातत्याने व्यायाम करतात. तो त्यांचा नित्याचा भाग आहे. मी आणि माझी पत्नी फिटनेस कोच वृंदा ग्रोवरने अमिताभ यांच्या सोबत 26 वर्षापासून काम केलं आहे. त्यांना एक व्यवस्थित ट्रेनिंग प्रोग्राम देण्यास मदत केली आहे. त्यामुळे त्यांचं रुटीन त्यांनी कायम सेम ठेवलं आहे. फक्त पाय आणि गुडघे मजबूत ठेवण्यासाठी काही गोष्टी केल्या आहेत, असं शिवोहम भट्ट यांनी सांगितलं.

हाच मंत्र, हेच रहस्य

योग्य व्यायाम रोज करणं आणि सोबतच बदलत्या क्षमतेनुसार त्यात बदल करणं, ताकद आणि शारीरिक कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी उपयोगी ठरतं, असं ते म्हणाले. याचाच अर्थ गेल्या 26 वर्षापासून ट्रेनरने सांगितलेलं रुटीन अमिताभ फॉलो करत आहेत. त्यांचं फिट राहण्याचं रहस्य हेच आहे आणि त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये.

एकूण पाहिलं तर अमिताभ बच्चन हेवी वर्कआऊट करत नाहीत. वा इंटेंस अॅक्टिव्हिटी करत नाहीत. तर नियमित व्यायाम करतात. संतुलित आहार घेतात आणि चांगली झोप घेतात. हाच त्यांच्या निरोगी आयुष्याचा मंत्र आहे. हे रुटीन कायम ठेवणं हेच त्यांच्या फिटनेसचं रहस्य आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us