
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अनुष्का शर्मा ही बऱ्याच वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही अनुष्का शर्मा ही चर्चेत राहणारे नाव आहे. आयपीएल मॅच दरम्यान विराट कोहली याच्या टिमला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच अनुष्का शर्मा ही स्टेडियममध्ये उपस्थित असते. अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावरही (Social media) सक्रिय असून चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी त्यांच्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे. मात्र, अजूनही विराट कोहली किंवा अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलीची झलक ही चाहत्यांना दाखवली नाहीये.
नुकताच मदर्स डे झालाय. मदर्स डेची खास पोस्ट अनुष्का शर्मा हिने सोशल मीडियावर शेअर केली. सध्या अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा दिसत असून चक्क बॉडीगार्डसोबत मुंबईमध्ये गाडीवर फिरताना दिसत आहे. अनुष्का शर्मा हिचा हा फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसलाय.
अनुष्का शर्मा ही बॉडीगार्डसोबत गाडीवर का फिरत आहे, हा प्रश्न अनेकांना पडला असेल ना? त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. रस्त्यावर झाड पडले असल्याने पूर्ण रस्ता जाम झाला आणि मग थेट अनुष्का शर्मा ही बॉडीगार्डसोबत गाडीवर निघाली. आता अनुष्का शर्मा हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
अनुष्का शर्मा हिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, मॅडम इतके काय जास्त महत्वाचे काम आहे जे तुम्ही बॉडीगार्ड सोबत गाडीवर निघालात. दुसऱ्याने लिहिले की, अनुष्का शर्मा हिला मुंबईच्या रस्त्यावर गाडीवर फिरायला प्रचंड आवडते, काही दिवसांपूर्वी ही विराट कोहली याच्यासोबत देखील गाडीवर फिरत होती.
तिसऱ्याने कमेंट करत लिहिले की, मॅडम आणि त्यांच्या बॉडीगार्ड देखील हेल्मेट घातले नाहीये. विशेष म्हणजे बॉडीगार्डचा आणि अनुष्का शर्मा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तरीही मुंबई पोलिस हे अनुष्का शर्मावर कारवाई का करत नाहीयेत? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तर किमान अनुष्का शर्मा हिच्यावर कारवाई करायला हवी. हेल्मेट न घालता हे दोघे गाडीवर फिरत आहेत, इतर लोक यांच्याकडून काय शिकणार ना?