Asha Bhosle Birthday Special | ‘इन आँखों की मस्ती’पासून ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’पर्यंत, ऐका आशा भोसले यांची सदाबहार गाणी!

| Updated on: Sep 08, 2021 | 10:29 AM

गायिका आशा भोसले (Asha Bhosle) आज आपला 88वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरवर्षी आशा भोसले त्यांचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत साजरा करतात. त्यांच्या वाढदिवशी सर्वजण घरी एकत्र जमतात. आशा भोसले यांनी चित्रपटांमधील पहिले गीत चुनरिया हे होते.

Asha Bhosle Birthday Special | इन आँखों की मस्तीपासून एक परदेसी मेरा दिल ले गयापर्यंत, ऐका आशा भोसले यांची सदाबहार गाणी!
आशा भोसले
Follow us on

मुंबई : गायिका आशा भोसले (Asha Bhosle) आज आपला 88वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरवर्षी आशा भोसले त्यांचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत साजरा करतात. त्यांच्या वाढदिवशी सर्वजण घरी एकत्र जमतात. आशा भोसले यांनी चित्रपटांमधील पहिले गीत चुनरिया हे होते. त्यांनी हे गाणे जोहराबाई अंबालेवाली आणि गीता दत्त यांच्यासोबत गायले होते. आशा ताईंनी वयाच्या 10व्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती.

आशा ताईंनी आपल्या गायन कारकिर्दीत आतापर्यंत हजारो गाणी गायली आहेत. आशा यांनी ताई गायनाबरोबर अभिनयातही हात आजमावला आहे. त्यांनी ‘माई’ या चित्रपटात अभिनय केला होता. आज, आशा ताईंच्या वाढदिवशी, आम्ही तुम्हाला त्यांची काही सदाबहार गाणी ऐकवणार आहोत, जी अजूनही प्रत्येकाच्या ओठांवर आहेत.

एक परदेसी मेरा दिल ले गया

‘फागुन’ चित्रपटाचे हे गाणे सुपरहिट ठरले होते. हे गाणे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायले होते. या गाण्याचे रीमिक्स पण आले, पण ते मूळ गाण्याशी जुळले नाही.

दिल चीज क्या है

जेव्हाही उमराव जान चित्रपटाचे नाव घेतले जाते, तेव्हा प्रत्येकाला ‘दिल चीज़ क्या है’ हे गाणे आठवते. हे गाणे आशा भोसले यांनी गायले आणि रेखावर चित्रित केले.

दम मारो दम

‘हरे कृष्णा हरे राम’ या चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे गाणे परवीन बॉबीवर चित्रित करण्यात आले होते. प्रत्येकाला हे गाणे खूप आवडते. या गाण्याचे रिमिक्स पण आले, पण ते मूळ गाण्याशी काही जुळणारे नाही.

कह दूं तुम्हे

‘दीवार’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नीतू सिंग, शशी कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. हे गाणे शशी कपूर आणि नीतू कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आले.

इन आंखों की मस्ती में

रेखावर चित्रित केलेले हे गाणे आशा भोसले यांनीही गायले होते. ‘उमराव जान’ या चित्रपटाचे हे गाणे आहे. त्याचे हे गाणे अजूनही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट आहे.

इंतेहा हो गई इंतजार की

अमिताभ बच्चन यांच्या ‘शराबी’ चित्रपटातील हे गाणे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायले होते. हे गाणे आजही सर्वांना खूप आवडते.

अष्टपैलू गायिका

आशा भोसले या अष्टपैलू दक्षिण आशियाई गायकांपैकी एक मानल्या जातात. तिच्या गाण्यांच्या श्रेणीमध्ये चित्रपट संगीत, पॉप, गझल, भजन, पारंपारिक भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीते, कव्वाली, रवींद्र संगीत आणि नजरूल गीते यांचा समावेश आहे. त्यांनी आसामी, हिंदी, उर्दू, तेलुगू, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, इंग्रजी, रशियन, चेक, नेपाळी, मल्याळम आणि मलय यासह 14हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

आर. डी. बर्मन आणि अशाजींची सुपरहिट जोडी

1966मध्ये आशा भोसले यांनी आर.डी. बर्मन यांच्या “आजा आजा मैं हूँ प्यार तेरा …” गाण्यासाठी आवाज दिला, ज्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. यामुळे त्याच्या आयुष्याला एक नवीन वळण आले, जे त्याच्या कारकिर्दीतील दुसरा महत्त्वाचा टप्पा मानला जाऊ शकते. शास्त्रीय संगीतापासून पाश्चात्य सूर गाण्यात प्रभुत्व मिळवलेल्या आशा भोसले यांनी 1981साली प्रदर्शित झालेल्या ‘उमराव जान’ चित्रपटातून गायनाची शैली बदलली.

हिंदी-मराठी गाण्यांबरोबरच आशा भोसले यांनी परदेशी गाण्यांमध्येही छाप पाडली आहे. आशा भोसले यांनी कॅनडा, दुबई आणि अमेरिकेत अनेक स्टेज शो केले आहेत आणि आपला ठसा उमटवला आहे. 1994 मध्ये, आर.डी. बर्मन यांच्या निधनाने आशा भोसले यांना खूप धक्का बसला आणि त्यांनी काहीकाळ गायनाकडे पाठ फिरवली. पतीच्या निधनाने दुःखी झालेल्या आशा यांनी काही काळ गायनापासून अंतर राखले. परंतु, 1995मध्ये संगीतकार ए.आर. रहमान यांनी “रंगीला” चित्रपटासाठी आशा भोसले यांना गाण्यासाठी राजी केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा गाण्यास सुरुवात केली.

हेही वाचा :

Eco Friendly Ganesh Chaturthi 2021 | अभिनेता शरद केळकरने अवघ्या काही मिनिटांत साकारला इको-फ्रेंडली गणपती बाप्पा, पाहा खास व्हिडीओ

‘जिस दिन तुमको देखेगी नजर, जाने दिल पर होगा क्या असर…’, पाहा ‘कबीर सिंग’ फेम वनिता खरातच्या घायाळ करणाऱ्या अदा!