सलमान खान आणि कटरिना कैफचा ‘टायगर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला रिलीज होणार

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांचा टायगर 3 हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत यशराज फिल्म्सकडून आज आज घोषणा करण्यात आली.

सलमान खान आणि कटरिना कैफचा टायगर 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, या तारखेला रिलीज होणार
सलमान खान आणि कटरिना कैफ- टायगर 3
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 6:02 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Bollywood Actor Salman Khan) आणि अभिनेत्री कटरिना कैफ (Katrina Kaif) यांचा टायगर 3 हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत यशराज फिल्म्सकडून आज आज घोषणा करण्यात आली. तसंच सलमान आणि कटरिना यांनीही आपल्या सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे. टायगर 3 हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. 21 एप्रिल 2023 ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. यात कटरिना आणि सलमान खान त्यांच्या ‘टायगर’ अंदाजात दिसत आहेत.

सलमानची इन्स्टाग्राम पोस्ट

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर या सिनेमाचा टिझर शेअर केला आहे. “सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या,  हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये टायगर सिनेमा येणार आहे. ईदच्या दिवशी या सिनेमाच्या स्वागतासाठी सज्ज राहा”, असं सलमान म्हणाला आहे.

कटरिनाची इन्स्टाग्राम पोस्ट

“टायगर आणि जोयाची जोडी लवकरच तुमच्या भेटीला येतेय. पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होतोय”, असं कटरिना म्हणाली आहे.

संबंधित बातम्या

सोलापुरात नागराजच्या ‘झुंड’ची जादू; 15-16 वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवलं!

“लय सुसाट, ताणूताणू मागं लागलीय ईडी”, नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा, राष्ट्रवादीचं खास नवं गाणं, ऐकाच….!

Jhund: “तुला अशा रुपात पहायचं नव्हतं..”; आकाश ठोसरच्या भूमिकेवर पहा आमिर काय म्हणतोय?