Kangana Ranaut | कंगना राणावत हिचे ट्विटरवर कम बॅक, या गोष्टीमुळे दोन वर्ष होते अकाउंट सस्पेंड

| Updated on: Jan 24, 2023 | 8:29 PM

लगेचच कंगनाने एक खास ट्विट देखील करून टाकले. आता कंगनाच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत पोस्टला लाईक्स करत आहेत.

Kangana Ranaut | कंगना राणावत हिचे ट्विटरवर कम बॅक, या गोष्टीमुळे दोन वर्ष होते अकाउंट सस्पेंड
'जर मी पुन्हा हा शब्द ऐकला तर...', कंगना रनौत कोणाला देतेय इशारा
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. कंगना राणावत हिचे सस्पेंड केलेले ट्विटर अकाउंट आता रिस्टोअर करण्यात आले आहे. २०२१ मध्ये कंगना राणावत हिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. काही वादग्रस्त (Controversial) ट्विट केल्याने कंगना राणावत हिला मोठा झटका बसला होता. विशेष म्हणजे ट्विटवर कंगना राणावत हिची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. नुकताच कंगना राणावत हिने एक ट्विट (Tweet) शेअर करत आपल्या चाहत्यांसोबत अकाउंट रिस्टोअर झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली. यासोबतच लगेचच कंगनाने एक खास ट्विट देखील करून टाकले. आता कंगनाच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत पोस्टला लाईक्स करत आहेत.

२०२१ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी दरम्यान कंगना राणावत हिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. यादरम्यान कंगना राणावत हिने काही वादग्रस्त ट्विट केल्याने अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते.

कंगना राणावत हिच्यावर ट्विटरची पॉलिसी तोडल्याच्या आरोप करण्यात आला होता. ज्यामुळे मे २०२१ ते २४ जानेवारी २०२३ पर्यंत कंगना राणावत हिचे अकाउंट सस्पेंड होते.

कंगना राणावत हिने ट्विटर अकाउंट रिस्टोअर झाल्याची बातमी शेअर केल्यानंतर तिच्या इमर्जन्सी या चित्रपटाविषयीची खास पोस्ट ट्विटवर शेअर केलीये.

कंगना राणावत हिचा इमर्जन्सी हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आता या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून या चित्रपटामध्ये कंगना राणावत ही इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.

कंगना राणावत हिचा आगामी इमर्जन्सी हा चित्रपट रिलीजच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. मध्य प्रदेश काँग्रेसने अनेक गंभीर आरोप केले होते. इतकेच नाहीतर नेहरू आणि गांधी परिवाराला बदनाम करण्याचा डाव असल्याचे त्यांनी केला होता.

काही दिवसांपूर्वीच इमर्जन्सी या चित्रपटाचे टीझर रिलीज करण्यात आले. या टीझरनंतरच कंगना राणावत हिच्या इमर्जन्सी चित्रपटावर मध्य प्रदेश काँग्रेसने आक्षेप घेतला होता.