Rohit Shetty | रोहित शेट्टी याला बसला मोठा धक्का, थेट प्रॉडक्शन हाऊस…

यापूर्वी रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी यांनी सिंबा हा चित्रपटसोबत केला होता.

Rohit Shetty | रोहित शेट्टी याला बसला मोठा धक्का, थेट प्रॉडक्शन हाऊस...
Rohit Shetty
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 28, 2022 | 6:57 PM

मुंबई : रोहित शेट्टी याचा चित्रपट सर्कस हा 23 डिसेंबरला रिलीज झालाय. मात्र, रोहित शेट्टीचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेलाय. रोहित शेट्टी याचे चित्रपट कायमच बाॅक्स ऑफिसवर धमाल करतात. पंरतू याला सर्कस हा चित्रपट अपवाद ठरलाय. रोहित शेट्टीच्या या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेमध्ये होता. यापूर्वी रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी यांनी सिंबा हा चित्रपटसोबत केला होता. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धमाल करत तब्बल 400 कोटींची कमाई केली होती.

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जात आहेत. सर्कस चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाची प्रचंड चर्चा चाहत्यांमध्ये होती. परंतू चित्रपट रिलीज झाल्यावर फ्लाॅप गेलाय.

या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही रोहित शेट्टी याने कोणतीच कमी सोडली नव्हती. मात्र, असे असताना देखील चित्रपट फ्लाॅप गेलाय. सर्कस चित्रपट रिलीज होऊन इतके दिवस झालेले असताना आतापर्यंत चित्रपटाने 33.51 कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

सर्कस चित्रपट फ्लाॅप जात असतानाच आता रोहित शेट्टी याला मोठा धक्का बसला आहे. रोहित शेट्टीच्या प्रॉडक्शनचे सीईओ जॉर्ज कॅमेरून यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे रोहितला हा मोठा धक्का आहे.

विशेष म्हणजे आता जॉर्ज कॅमेरून हे स्वत: चेच प्रॉडक्शन सुरू करणार आहेत. तरण आदर्श यांनी यासंदर्भातची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. रणवीर सिंह याचे दोन चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेले आहेत.